दारूवा वाव नाही; सुरगाव येथे रंगाविना होळीचे सलग २८ वर्षे; घेतल्या जाते स्पर्धा परीक्षा

सामाजिक, आध्यात्मिक व प्रबोधनात्मक कार्यक्रमांची रेलचेल

    दिनांक :01-Mar-2026
Total Views |
विजय माहुरे

सेलू,
Surgaon alcohol-free Holi, होळी आणि धुळवळ म्हटले की फत दारूचा विषयच मोठ्या प्रमाणात अजेंड्यावर असतो. त्यासोबत गावा बाहेर जात मासाहारी पार्टीचे नियोजन होत असताना तालुयातील सुरगाव येथे मात्र रंगोत्सव साजरा करताना शेतकरी संमेलन, स्पर्धा परीक्षा, रामधुन, ग्राम स्वच्छतेसाठी समित्या तयार झाल्या आहेत. गेल्या २८ वर्षांपासून सुरू असलेल्या रंगाविना होळीचा उत्साह तसाच आहे. उत्साहाला भतीची जोड मिळते आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी दिलेल्या मंत्रावर हा रंगोत्सव साजरा होतो. सर्वधर्मसमभाव, संतविचार आणि सामाजिक प्रबोधनाचा संदेश देणारा हा सोहळा आता केवळ तालुयातच नव्हे तर जिल्हाभरात नावारूपास आला आहे.
 
 
 
Surgaon alcohol-free Holi,
 
सप्तखंजिरी वादक प्रवीण देशमुख यांच्या पुढाकारातून आयोजित या उत्सवात ‘अभिनव धुळवंदन’ आणि ‘संत विचार ज्ञानयज्ञ’ यांसारख्या उपक्रमांद्वारे समाजप्रबोधनाचा ध्यास घेतला जात आहे.
रविवारपासून सुरू झालेल्या सोहळ्याचे उद्घाटन सायंकाळी ५ वाजता नायब तहसीलदार मधुकर ठाकरे, मंडळ अधिकारी रमेश भोले, ज्येष्ठ पत्रकार प्रफुल लुंगे यांच्या हस्ते झाले. सायंकाळी ५ ते ६ सामुदायिक प्रार्थना व मार्गदर्शन कार्यक्रम मांडले दादा (वर्धा) यांच्या मार्गदर्शनाखाली झाले. सायंकाळी ६ ते ७ स्नेहभोजन तर रात्री ७ ते १० या वेळेत सागर महाराज नांदुरकर (बोपापूर-अजनसरा) यांचे भारुड झाले. सोमवार, २ रोजी पहाटे ग्रामस्वच्छता व सामुदायिक ध्यान, सकाळी योगासन व आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार, ३ मार्च रोजीपहाटे ग्रामस्वच्छता, सामुदायिक ध्यान व सकाळी ६ ते ८ धुलीवंदन संदेश व प्रभातफेरी निघेल. सुरेश मांडले, दादा हांडे व वागदरकर यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. सकाळी ८ ते ११ संत संग पर्व, संतविचार ज्ञान कार्यक्रम, कार्यकर्ता सत्कार, दानवाटप व भजन संमेलन होणार आहे.
 
 
या कार्यक्रमास भाऊसाहेब फुटे, मोहन गुजर, मोहन अग्रवाल, तहसीलदार शकुंतला पराजे, मुरलीधर बेलखोडे, अनिल नरेडी, मोहन मोहोळ, सुनील बुरांडे, भास्कर वाळके आदी उपस्थित राहणार आहेत.दुपारी ३ ते ५ या वेळेत श्री गुरुदेव सेवा मंडळ, सुरगाव यांचा सांस्कृतिक कार्यक्रम होईल. सायंकाळी ५ ते ६ सामुदायिक प्रार्थना तर रात्री ६ ते १० समारोप कार्यक्रमात प्रवीण देशमुख (सप्तखंजिरी वादक, सुरगाव) यांचे सादरीकरण होणार आहे.
सामाजिक एकात्मता, स्वच्छता, आरोग्य, अध्यात्म आणि प्रबोधन यांचा संगम घडवणारा सुरगाव येथील आदर्श धुलीवंदन सोहळा हा ग्रामविकासाचा आदर्श ठरत आहे.
 
 
गाव जेवन, शेतकरी मेळावा आणि स्पर्धा परीक्षा
 
 
सुरगावात मोजकेच उंबरठे. पण, सर्व कायम एकत्र असतात. उट्टे काढण्यासाठी होळीचा मुहूर्त शोधल्या जात असताना येथे शेतकरी व ग्राहक मेळावा, सामान्य ज्ञान परीक्षा, तसेच सर्वधर्म समन्वय संमेलन आयोजित करण्यात आले आहे. नागपूर येथील राष्ट्रीय प्रबोधनकार व सप्तखंजिरी वादक तुषार सूर्यवंशी यांचा प्रबोधनात्मक कार्यक्रम होणार आहे.