अस्थिरोग व वातरोग मोफत निदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद!

    दिनांक :01-Mar-2026
Total Views |
नागपूर,
Vijaya Multispeciality Hospital विजया मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी अस्थिरोग व वातरोग मोफत निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत पार पडलेल्या या शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.शिबिरात अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. कौस्तुभ काळे (एम.एस. ऑर्थो, डी.एन.बी. ऑर्थो), लिगामेंट सर्जरी स्पेशालिस्ट यांनी रुग्णांची सविस्तर तपासणी करून आवश्यक मार्गदर्शन केले. तसेच हाडातील कॅल्शियम तपासणीसाठी बीएमडी (BMD) टेस्टची सुविधा निःशुल्क उपलब्ध करून देण्यात आली.

sadhu 
 
 
सांधेदुखी, गुडघेदुखी, पाठदुखी तसेच ऑस्टिओपोरोसिस यांसारख्या आजारांबाबत रुग्णांना सविस्तर माहिती देण्यात आली. ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शिबिराचा लाभ घेतला.Vijaya Multispeciality Hospital रुग्णसेवेसोबतच रुग्णजागृतीचा उद्देश साध्य करणारे हे शिबिर यशस्वी ठरले. शिबिराच्या आयोजनासाठी सदानंद साधु तसेच हॉस्पिटलचे. ईश्वरी व सोनू सिस्टर यांनी विशेष परिश्रम घेतले.
 
सौजन्य:सदानंद साधु ,संपर्क मित्र