छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरात तक्रारींचे निवारण करणार

तहसीलदार वैशाख वाहूरवाघ यांचा विश्वास

    दिनांक :01-Mar-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
आर्णी,
yavatmal arni news छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान पहिल्या टप्पाच्या अंमलबजावणीबाबत आर्णीचे तहसीलदार वैशाख वाहूरवाघ यांनी पत्रपरिषदेत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरात विविध तक्रारींचे निवारण करण्यात येणार असून या शिबिराचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन तहसीलदार वैशाख वाहूरवाघ यांनी पत्रपरिषदेत केले.
 

yavatmal arni news  
सर्वसामान्य जनता व शेतकèयांचे महसूल विभागांतर्गत क्षेत्रातील कार्यालयाशी संबंधित दैनंदिन प्रश्न त्वरित निकाली काढणे, महाराष्ट्र जमीन महसूल संहितेचा नवीन तरतूदीची जनजागृती करणे, प्रभावी अंमलबजावणी करणे डिजिटल सेवाचा जास्तीत जास्त वापर सुनिश्चित करणे नागरिकांना सिंगल डे सर्विस डिलिव्हरीद्वारा सेवा पुरवणे या उद्देशाने मार्च ते मे या कालावधीत राज्यात महसूल मंडळ स्तरावर तसेच नगर परीषद, नगर पंचायत पातळीवर छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर अभियान पहिला टप्पा राबविण्यात येणार आहे.
अभियानातंर्गत शिबिराची yavatmal arni news पूर्व तयारी करण्यासाठीच्या मार्गदर्शक सूचना, प्रलंबित फेरफार निकाली काढणे, अभिलेख दुरुस्ती हेल्प डेस्क सातबारामधील चुकांसंदर्भात अर्ज स्विकारणे, आवश्यक कागदपत्राची तपासणी, त्रुटी सूची देणे व तत्काळ करता येणाèया दुरुस्ती नोंद घेणे, या डेस्कवर भूमी अभिलेख विभागातील एक कर्मचारी उपस्थित राहील, याची दक्षता घ्यावी दक्षता घ्यावी डिजीटल सातबारा, आठ अ, उतारे तत्काळ उपलब्ध करुन देण्यात येणार आहे, लोकसेवा हक्क कायदा तत्काळसेवा उत्पन्न प्रमाणपत्र, रहिवासी, अधिवास प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र, नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र इत्यादी अर्ज स्वीकारणे तसेच पूर्वी प्राप्त अर्जाच्या अनूषंगाने प्रमाणपत्र वितरीत करणे, अकृषिक रुपांतरण करण्यासाठी जिल्हाधिकाèयांची स्वतंञ परवानगी आवश्यक नाही, तुकडेबंदी कायद्याविरुद्ध 15 नोव्हेंबर 1965 ते 15 ऑक्टोबर 2024 पर्यंत प्रमाणभूत सीमेपेक्षा कमी क्षेत्राच्या जमिनीचे खरेदी विक्रीचे व्यवहार व हस्तांतरणाबाबत गावनिहाय यादी तयार करणे, अनोंदणीकृत व्यवहाराविषयी गावनिहाय माहिती गोळा करुन नोंदणीकरिता नोंदणी विभागाकडे पाठविणे सातबारा करुन शिबिराच्या दिवशी अद्यावत सातबाराचे वाटप करणे, मंडळ स्तरावरिल सर्व शाळांना आढावा घेवून घेऊन दाखले वाटप न झालेल्या विद्यार्थ्याच्या याद्या तयार करणे, विद्यार्थ्याकडून आवश्यक कागदपञासह परीपुर्ण अर्ज भरुन घेणे शिबीराच्या दिवशी दाखल्याचे वाटप करणे. सर्वासाठी घरे अंतर्गत पट्टे वाटपासाठी बाकी राहिलेल्या लाभार्थ्यांची यादी तयार करणे, भूसंपादन केलेल्या व अकृषित परवानगी प्रकरणी कमी जास्त पत्रके तयार करुन गावदप्तर अद्ययावत करणे अशा विविध तक्रारींचे निवारण करण्यात येणार असून 10 एप्रिल सावळी, 17 एप्रिल बोरगाव, 8 मे अंजनखेड, 15 मे तहसील कार्यालय येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानाचे आयोजन करण्यात येणार आहे. तालुक्यातील नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन तहसीलदार वैशाख वाहूरवाघ यांनी पत्रकार परिषदेत केली आहे. यावेळी तहसीलदार वैशाख वाहूरवाघ, नगर परिषद मूख्यधिकारी रवींद्र राऊत, नायब तहसीलदार प्रमोद गुल्हाने, नायब तहसीलदार डॉ. संतोष आडमुलवाड, निवासी नायब तहसीलदार उदय तुंडलवार उपस्थित होते.