धारदार अवजारे वापरणारा व दरोड्यातील गुन्हेगाराला अटक

    दिनांक :01-Mar-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
वणी,
Wani police operation शहरात दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने धारदार शस्त्रे बाळगणाèया इसमास तसेच दरोडा गुन्ह्यातील दोन महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपीस स्थानिक गुन्हे शाखा पथकाने अटक करून मोठी कारवाई करण्यात आली.
 

Wani police operation  
जिल्ह्यात अवैध शस्त्रे बाळगून सर्वसामान्य नागरिकांत दहशत पसरविणाèयांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी दिले होते. त्यानुसार 27 फेब्रुवारीला ‘ऑल आऊट ऑपरेशन’ अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ पथकाने वणी येथे नाईट पेट्रोलिंग दरम्यान विशेष मोहिम राबविली. या पथकाला प्राप्त माहितीच्या आधारे माळीपुरा वणी येथील निलेश उर्फ अनिकेत कुमेश सोनटक्के (वय 22) याने भविष्यात दखलपात्र गुन्हा करण्याच्या उद्देशाने घरात अवैधरित्या विविध प्रकारची धारदार शस्त्रे साठवून ठेवली असल्याचे समजले. तातडीने त्याच्या घराचीझडती घेतली असता तलवारी, चाकू, कुकरी अशी एकूण 6 धारदार अवजारे, अंदाजे किंमत 14 हजार रुपये जप्त करण्यात आली.
या प्रकरणी पोलीस स्टेशन वणी येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस पुढील कायदेशीर कारवाईसाठी वणी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. वणी पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यांतर्गत कोंडावार यांच्या घरी झालेल्या दरोड्यातील फरार आरोपी अनिकेत उर्फ बांडी प्रकाश ऐगडवार (वय 26, यवतमाळ) याला यवतमाळात ताब्यात घेण्यात आले, तो दोन महिन्यांपासून फरार होता.ही कारवाई पोलिस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलिस अधीक्षक अशोक थोरात, पोलिस निरीक्षक सतीश चवरे यांच्या मार्गदर्शनात सपोनि दत्ता पेंडकर, धनराज हाके, सुनील खंडागळे, सुधीर पांडे, नीलेश निमकर, सुधीर पिदुरकर, सलमान शेख, रजनिकांत मडावी, सतीश फुके सर्व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने यशस्वी पार पाडली.