कै. डॉ. सुशीला गावंडे यांचे जीवन विद्यार्थी व समाजासाठी समर्पित : डॉ. अतुल गावंडे

    दिनांक :11-Mar-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा

उमरखेड,
Atul Gawande कै. डॉ. सुशीलाताई गावंडे यांचे संपूर्ण जीवन विद्यार्थी व समाजासाठी समर्पित होते. गोपिकाबाई सीताराम गावंडे महाविद्यालयाचे संजीवक डॉ. आत्माराम गावंडे यांना साथ देत त्यांनी महाविद्यालयास आपले तिसरे अपत्य मानले होते. या तिसèया अपत्याच्या विकासासाठी ध्यास घेऊन रोटरी इंटरनॅशनलच्या मदतीने आणि स्वतः त्यांनी भरघोस देणगी दिली. मानव समाजाच्या कल्याणासाठी त्यांनी आपले आयुष्य वेचले, या शब्दात डॉ. अतुल गावंडे यांनी शद्धांजली अर्पण केली.
 

Atul Gawande 
डॉ. अतुल गावंडे Atul Gawande आणि सुकन्या अ‍ॅड. सुमिता गावंडे अमेरिकेहून डॉ. सुशीला गावंडे यांचा अस्थिकलश घेऊन गावंडे महाविद्यालयात आले आहेत. कै. डॉ. सुशीलाताई गावंडे यांच्या अस्थिकलशाचे दर्शन, पूजन आणि शद्धांजली अर्पण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.अ‍ॅड. सुमिता गावंडे यांनी कै. डॉ. सुशीलाताई गावंडे यांचा जीवनप्रवास उलगडून सांगत त्यांनी केवळ आपले जीवनच येथील विद्यार्थी आणि समाजासाठी अर्पण केले नव्हते तर आपल्या अस्थींचे विसर्जन गावंडे महाविद्यालय आणि उटी येथे करावे, ही त्यांची शेवटची इच्छा होती. यापुढेही आम्ही हे महाविद्यालय, उमरखेडच्या परिसराच्या विकासासाठी कार्यरत राहू, असे अभिवनचही त्यांनी दिले.या कार्यक्रमास यवतमाळ जिल्हा अखिल कुणबी समाज संस्थेचे संचालक , सर्व पदाधिकारी, शैक्षणिक, राजकीय, सहकार क्षेत्रातील विविध मान्यवर, गावंडे परिवार तसेच गावंडे दाम्पत्यावर प्रेम करणारे नागरिक, महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी या कार्यक्रमाला बहुसंख्येने उपस्थित होते.