सकल हिंदू समाज संमेलनात भदंतजींचे संदेश

    दिनांक :11-Mar-2026
Total Views |
नागपूर,
Sakal Hindu Samaj जागतिक युद्धामुळे सध्या अस्थिरता वाढली असली तरी सर्व भारतीयांना एकत्र करण्यासाठी हिंदुत्वच भारताची खरी ओळख आहे, असे प्रतिपादन ८३ वर्षीय बौद्ध धर्मगुरू भदंत महानाम महास्थवीर यांनी केले. ते परसोडी, गोपाल नगर येथील त्रिशरण बुद्ध विहार आणि श्री हनुमान मंदिर, गायत्री नगर यांच्या तर्फे आयोजित सकल हिंदू समाज संमेलन मध्ये मुख्य वक्ता म्हणून बोलत होते. भदंतजी म्हणाले की, त्यांनी वयाच्या १३ व्या वर्षी परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडून दीक्षाभूमी येथे दीक्षा घेतली. त्यानंतर प्रामाणिकता, सभ्यता, नम्रता, आपुलकी व धम्माच्या मार्गाने समाजसेवा करत आहेत. त्यांनी संविधानातील बंधुतेच्या संकल्पनेनुसार सर्व भारतीयांना एकत्र येण्याचे महत्त्व अधोरेखित केले.
 
Sakal Hindu Samaj
 
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्रज्ञा-प्रवाह चे पश्चिम क्षेत्र संयोजक सुनील किटकरू यांनी भूषविले. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन आणि भारत मातेचे पूजन करून झाली, ज्यात त्रिमूर्ती भाग संघचालक व विदर्भ कल्याणकारी संस्थेचे दीपक देशपांडे, पर्यावरण प्रेमी इंजिनीअर रवी पराते, आणि समाजसेविका प्रतिभा लोथे सहभागी होत्या. Sakal Hindu Samaj प्रतिभा यांनी उपस्थित मातृशक्तीला आवाहन केले की, मुलांवर मातृभाषा, वेशभूषा, भजन-आरती, स्वच्छ भवन, तीर्थस्थळांचे भ्रमण आणि सात्विक भोजन या सहा संस्कार घडवायला हवेत. सुनील किटकरू म्हणाले की, नालंदा आणि तक्षशिला येथे अनेक विद्वान बौद्ध धर्मगुरु होते, परंतु अल्लाउद्दीन खिलजीच्या विध्वंसामुळे त्यांचा नाश झाला. आत्मकेंद्रीत समाजाला योग्य मार्गदर्शन करून संघटित करणे हे शंभर वर्षांपूर्वी परमपूज्य डॉ. हेडगेवार यांनी सुरू केले. पर्यावरण आणि समाजातील समरसता आपल्या जीवनात असणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.
 
 
कल्पना महाशब्दे यांनी प्रास्ताविक केले, तर विवेक तरासे यांनी पाहुण्यांचा परिचय दिला. महिला दिवसानिमित्त ज्येष्ठ महिलांचा सत्कार करण्यात आला आणि भजन दिंडीत भाग घेतलेल्या तरुणींचा सन्मानही करण्यात आला. सूत्रसंचालन पूजा कानडे यांनी केले, तर आभार महेंद्र पहाडे यांनी व्यक्त केले. Sakal Hindu Samaj कार्यक्रमाची सुरुवात भारत मातेच्या आरतीने झाली, तर समाप्ती सामूहिक वंदे मातरमने झाली. वीर हनुमान शाखा, स्टेट बँक प्रभात शाखा आणि सिद्धार्थ प्रभात शाखा यांनी उत्तम नियोजन केले. मोठ्या संख्येने उपस्थित नागरिकांना लाडू आणि खिचडीचा प्रसाद वितरित करण्यात आला.
सौजन्य: सुरेश विंचूरकर, संपर्क मित्र