वरोडा,
chandrapur-news : इराण-इस्रायल तणावामुळे मध्यपूर्वेत निर्माण झालेल्या अस्थिर परिस्थितीत दुबई येथे अडकलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील ज्योती पुरुषोत्तम दुपारे या युवतीचे अखेर सुखरूप मायदेशी आगमन झाले. यापूर्वी दोन विद्यार्थ्यांना चंद्रपुरात परत आणण्यात आले होते.
मुलगी परदेशात अडकून असल्याची चिंता सहन न झाल्याने त्यांच्या वडिलांनी मुकेश जिवतोडे यांच्याशी संपर्क साधून परिस्थितीची माहिती दिली. त्यांनी शिवसेनेचे पूर्व विदर्भ संपर्क मंत्री अॅड. आशिष जयस्वाल यांच्याशी संपर्क साधून ही बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिली. जयस्वाल यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क साधून ज्योती दुपारे यांच्या सुरक्षित आगमनासाठी प्रयत्न सुरू केले होते.