नोंदणी केलेल्या शेतकर्‍यांचा मका खरेदी करा अन्यथा भावफरकाची रक्कम द्या

*भारतीय किसान संघाची मागणी

    दिनांक :11-Mar-2026
Total Views |
बुलढाणा,
bharatiya-kisan-sangh : खरीप हंगाम २०२५—२६ मध्ये शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत जिल्ह्यातील मोठ्या संख्येने शेतकर्‍यांनी मका खरेदीसाठी नोंदणी केली असली तरी अनेक शेतकर्‍यांचा मका अद्याप खरेदी न झाल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे नोंदणी केलेल्या सर्व शेतकर्‍यांचा मका तातडीने खरेदी करावा, अन्यथा त्यांना भावफरकाची रक्कम द्यावी अशी मागणीचे निवेदन दि. ११ मार्च रोजी भारतीय किसान संघाने जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना देण्यात आले.
 
 
cfsdf
 
 
 
शासनाकडे करण्यात आली आहे. खरीप हंगामात जिल्ह्यातील सुमारे ५७८९ शेतकर्‍यांनी मका खरेदीसाठी नोंदणी केली होती. मात्र त्यापैकी केवळ १३६८ शेतकर्‍यांचा मका खरेदी झाल्याची माहिती समोर आली असून अजूनही ४३२१ शेतकर्‍यांची मका मोजणी व खरेदी बाकी असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे उर्वरित शेतकर्‍यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.शासनाने मकासाठी प्रती क्विंटल २४०० रुपये आधारभूत किंमत जाहीर केली असताना सध्या व्यापारी २१०० ते २२०० रुपये दराने मका खरेदी करत आहेत. कमी दरामुळे शेतकर्‍यांचे आर्थिक नुकसान होत असून व्यापारी परिस्थितीचा फायदा घेत असल्याचा आरोप शेतकर्‍यांकडून करण्यात येत आहे.
 
 
दरम्यान, रब्बी हंगामातील मका बाजारात येण्यास सुरुवात झाल्याने पुढील काळात दर आणखी घसरण्याची शयता व्यक्त केली जात आहे. आधीच विविध संकटांना सामोरे जाणार्‍या शेतकर्‍यांना यामुळे मोठा फटका बसत असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने उर्वरित शेतकर्‍यांचा मका तातडीने खरेदी करावा किंवा ज्यांची अधिकृत नोंदणी झाली असूनही मोजणी व खरेदी झाली नाही अशा शेतकर्‍यांना भावफरकाची रक्कम अदा करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर जिल्हाध्यक्ष अशोक कुळकर्णी, जिल्हामंत्री राजेंद्र इंगळे, उपाध्यक्ष नंदकुमार खडके, सदस्य सदाशिव शिंदे, तालुका अध्यक्ष दत्तात्रय टेकाळे, तालुका उपाध्यक्ष अशोक राजपूत, सदस्य विनायकराव गोडबोले, प्रभाकर वारे यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.