जोगीनगर भागात निशुल्क रक्त तपासणी शिबिर

    दिनांक :11-Mar-2026
Total Views |
नागपूर,
Free blood test camp राष्ट्रसेविका समिती सेवा विभाग, अजनी आणि लोककल्याण डायग्नोस्टिक यांच्या संयुक्त विद्यमाने मनपा मराठी प्राथमिक शाळा, भिमनगर येथे निशुल्क रक्त तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात डॉ. संपदा बालपांडे आणि डॉ. प्रतीक्षा देशमुख यांनी सहकार्य केले. या कार्यक्रमात वस्तीतील ५८ नागरिकांनी लाभ घेतला.
 
Free blood test camp
 
कार्यक्रमास सेवा विभाग प्रमुख पद्माकर साठे, सेवा कार्यकर्ते शेखर काळे व दीपक जळगाव, तसेच राष्ट्रसेविका समिती श्रीनगर श्रीनिधी शाखेच्या पूर्वा कुलकर्णी, कांचन भालेकर, संध्या जोशी, स्नेहल जोशी, विजया पाठक, जयू अत्रे, प्रांजली कुलकर्णी उपस्थित होत्या. Free blood test camp शिबिर यशस्वी होण्यासाठी वस्तीतील शशिकांत ना. रनवरे, विजय बांगर तसेच सुगयोग नगर येथील नगराळे काका यांनी मोलाचे सहकार्य केले. भीमनगर, जोग नगर, पार्वतीनगर, साकेतनगर, सुयोगनगर व रामेश्वरी तसेच संलग्न वस्तीतील नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला.
सौजन्य: सुनील गव्हाणे, संपर्क मित्र