उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान

    दिनांक :11-Mar-2026
Total Views |
नागपूर,
Honoring women श्री जैन सेवा मंडळच्या महिला समितीच्या विद्यमाने जागतिक महिला दिवस व होळी मिलन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान उन्नती फाउंडेशनचे अध्यक्ष अतुल कोटे यांच्याकडे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून लेखिका मीनल ताजनेकर उपस्थित होत्या जैन सेवा मंडळाचे अध्यक्ष पियुष शहा यांनी आपल्या प्रास्ताविकात मंडळाचे उद्दिष्ट, कार्य आणि येणाऱ्या महावीर जन्म कल्याण महोत्सव संबंधित कार्यक्रमांची संपूर्ण माहिती दिली.
  
nagpur
 
जागतिक महिला दिनानिमित्त समाजातील धार्मिक व सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या डॉ. मंजू संदीप जैन आणि यामिनी योगेश जैन यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष अतुल कोटे यांनी महिलांच्या सामाजिक योगदानाचे महत्त्व अधोरेखित केले आणि मार्गदर्शन केले. Honoring women मीनल ताजनेकर यांनी महिलांच्या कार्याचा गौरव करत महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या कार्यक्रमात महिलांसाठी विविध खेळांचे आयोजन करण्यात आले होते. तसेच रासायनिक रंगांचा वापर न करता फुलांची होळी खेळून उपस्थित महिलांनी भरपूर आनंद अनुभवला.
 
पाहुण्यांचे स्वागत कार्यक्रमाच्या संयोजिका रजनी हेमंत जैन यांनी केले, कार्यक्रमाचे संचालन मंडळाचे महामंत्री डॉ. दीपक शेंडेकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रिया पोहरे यांनी केले. Honoring women कार्यक्रमाला जैन सेवा मंडळाचे माजी अध्यक्ष शरद मचाले, रिचा जैन आणि इतर प्रमुख महिला उपस्थित होत्या, ज्यात राखी शाह, छाया जैन, चंद्रकांता कासलीवाल, अनामिका मोदी, स्वतंत्र जैन, मानसी जैन यांचा समावेश होता.
सौजन्य: दीपक शेंडेकर, संपर्क मित्र