नागपूर,
Mahalaxmi Temple महालक्ष्मी मंदिर आणि श्री एजन्सीज (प्रोप्रायटर आसावरी कोठीवान) यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे प्रोफेसर नीलिमा जोशी (डायटीशियन) उपस्थित होत्या. त्यांनी महिलांना आहार, आचार विचार आणि जीवनशैलीबाबत मार्गदर्शन केले. अध्यक्ष रोहिणी आलोणी यांनी ‘बुगडी माझी सांडली’ या विषयावर भाषण केले व महिलांनी अलंकाराच्या पारंपारिक वापराचे महत्व समजावून सांगितले.

कार्यक्रमात दिक्षिता शहाणे व वीनी देशकर यांनी सुंदर गीत सादर केले, तर सरोज बहादुरे यांनी महिलांसाठी विविध प्रश्नमंजुशेचे आयोजन केले. मधुबन निवासी जेष्ठ प्रतिभा आजी पुरोहित (वय ९२ वर्ष) यांचा समाजसेवेतील योगदान लक्षात घेऊन सन्मान करण्यात आला. Mahalaxmi Temple कार्यक्रमात श्रेयसी श्रीपाद जोशी यांना भगवद्गीता जिज्ञासू, गीता गुंजन, गीता पाठक, गीता पथिक, गीताव्रती या परीक्षा उत्तम रित्या उत्तीर्ण केल्याबद्दल सुवर्णपदक व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच शृंगेरी शारदापीठम्, दक्षिणाम्नाय पीठम् येथे भगवद्गीतेची परीक्षा उत्तीर्ण केल्याबद्दल प.पू. विधुशेखर भारती शंकराचार्य यांच्या हस्ते ₹21,000 रोख पारितोषिक दिले गेले.
कार्यक्रमात जयश्री पुरोहित, योग-नृत्य परिवाराच्या तेजी बीसेन, वसुधा कठाळे, संगीता माळवणकर, सुरेखा पाटील, गीता सुरसावंत, कविता रत्नपारखी, स्मिता कीन्हीकर, परिणीता यादव, संघमित्रा जनबंधू, स्वप्ना ढोबळे, चंद्रिका मेनन यांनी २२ जानेवारीला वैयक्तिक १४४ सूर्यनमस्कार करून विशेष उपक्रम साकारला आणि त्यांचा सन्मान करण्यात आला. Mahalaxmi Temple कार्यक्रमाचे संचालन, प्रास्ताविक आणि आभार प्रदर्शन आसावरी कोठीवान यांनी केले, तर पाहुण्यांचा परिचय व मनोगत रुपाली देशकर यांनी दिले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महालक्ष्मी मंदिराचे अध्यक्ष शरदचंद्र लांबे यांनी विशेष परिश्रम घेतले. माधवी हटेवार, सारंगी पाचपोर, शुभदा देव, वासंती जोशी, रंजना धकीते, कविता बोबडे, राजश्री डुम्मनवार, रेणुका पथे यांनी मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रमात मेघना जोशी व माय बनसोडे यांच्या गाण्यांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. अल्पोपहारानंतर कार्यक्रमाचा समारोप झाला. सर्व महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
सौजन्य: आसावरी कोठीवान, संपर्क मित्र