पैसे परत न मिळाल्याने गुंतवणूकदारांचा रोष

*‘यहोवा यिरे बचत निधी’ शाखेतील प्रकार *संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍याला घेराव

    दिनांक :11-Mar-2026
Total Views |
चंद्रपूर,
jehovah-yire-savings-fund-branch : येथील ‘यहोवा यिरे बचत निधी लिमिटेड’ या संस्थेत आपल्या काबाडकष्टाचे पैस गुंतवणार्‍या ग्राहकांच्या संयमाचा बांध बांध फुटला आणि त्यांनी तिकडे मोर्चा वळवला. मागील तीन महिन्यांपासून हक्काचे पैसे मिळवण्यासाठी या संस्थेच्या कार्यालयाचे उंबरठे झिजवणार्‍या गुंतवणूकदारांनी बुधवारी आक्रमक पवित्रा घेत, संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश बोरकुटे यास घेराव घातला.
 
 

kl 
 
 
 
यहोवा-यिरे बचत निधी लिमिटेडच्या जिल्ह्यात व जिल्हा बाहेर अनेक शाखा आहेत. या शाखेच्या माध्यमातूनग्राहकांनी मुदत ठेव, रिकरिंग डिपॉझिट आणि बचत खात्याच्या माध्यमातून लाखो रुपये गुंतवले आहेत. मात्र, गेल्या तीन महिन्यांपासून ग्राहकांना परतावा देण्यास संस्थेकडून टाळाटाळ केली जात होती. रोख उपलब्ध नाही किंवा वरिष्ठ कार्यालयाकडून निधी आलेला नाही, अशी कारणे देऊन गुंतवणूकदारांना रिकाम्या हाती परत पाठवले जात होते. त्यामुळे गुंतवणूकदारामध्ये संतापाची लाट उसळली.
 
 
बुधवारी चंद्रपूरसह पोंभुर्णा, गडचांदूर, वरोडा, भद्रावती, घुग्घूस आदी शाखेतील गुंतवणूकदार संस्थेच्या चंद्रपूर येथील शाखेत धडकले व रोष व्यक्त केला. एप्रिल अखेरपर्यंत पैसे न मिळाल्यास अधिकृत तक्रार दाखल करण्याचा इशारा गुंतवणूकदारांनी दिला. या प्रकारामुळे खासगी वित्त संस्थांच्या विश्वासार्हतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, लहान गुंतवणूकदार मात्र हवालदिल झाला आहे.
 
कर्जाची वसुली न झाल्याने परतफेडीस विलंब : रमेश बोरकुटे
 
 
परिस्थिती तणावपूर्ण होत असल्याचे पाहून संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश बोरकुटे यांनी कार्यालयात दाखल होत ग्राहकांशी चर्चा केली. कर्ज वसुली योग्य प्रकारे होत नसल्याने गुंतवणूकरांचे पैसे देण्यात विलंब झाला आहे. संस्थेने दिलेली कर्ज वसुलीची प्रक्रिया सध्या सुरू आहे. या वसुलीतून जमा होणार्‍या निधीतून 20 एप्रिल ते 30 एप्रिल दरम्यान गुंतवणूकदारांच्या रकमेची परतफेड करण्यात येईल, असे आश्वासन बोरकुटे यांनी गुंतवणूकदारांना दिले.