प्रज्ञासूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रबोधनपर्व समिती

पुसद 2026 च्या अध्यक्षपदी लक्ष्मण कांबळे

    दिनांक :11-Mar-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
पुसद,
Laxman Kamble 4 मार्च 2026 रोजी युनियन बँक चौक परिसरातील ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र येथे प्रज्ञासूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव प्रबोधनपर्व आयोजन समिती पुसदच्या 2026 च्या अध्यक्षपदासाठी समाजबांधवांच्या वतीने सभा बोलावण्यात आली होती.
 


Laxman Kamble elected president, 
यासभेला विठ्ठल खडसे शिक्षण सभापती न.प.पुसद तसेच प्रज्ञापर्व समितीचे माजी अध्यक्ष विश्वास भवरे, प्रा.कल्याण साखरकर, तसेच प्रा. मिलिंद सोमकुंवर, अ‍ॅड. यादवराव जांभुळकर, राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेचे जिल्हाध्यक्ष गणपत गव्हाळे, बामसेफचे संतोष सुरवाडे, भगवान हनवते, दीपक कांबळे, अविनाश भवरे, भारत कांबळे, बंडू गंगावणे, रिपाईचे ज्येष्ठ नेते प्रकाश धुळे, प्रा. अंबादास वानखडे, व्हडगिरे, भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष अशोक भालेराव, नीतेश खंदारे, भास्कर बनसोड, गुरू उचाडे तथा विविध सामाजिक संघटनेचे Laxman Kamble पदाधिकारी व प्रतिष्ठीत नागरिक उपस्थित होते. ज्येष्ठ मंडळींनी प्रबोधनपर्व समितीच्या पुढील नियोजनतील कार्यक्रमाबद्दल मार्गदर्शन करून आपले मनोगत व्यक्त केले आणि शेवटी लक्ष्मण सदाशिव कांबळे यांची प्रज्ञा सूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव प्रबोधनपर्व आयोजन समिती 2026 च्या अध्यक्षपदी सर्वांच्या एकमताने निवड करण्यात आली. मावळते अध्यक्ष 2025 चे आयुष्यमान संतोष अंभोरे यांचे स्वागत करून त्यांना निरोप देण्यात आला.