गायत्री मंत्राच्या महाअनुष्ठानासाठी बैठकीचे आयोजन

    दिनांक :11-Mar-2026
Total Views |
नागपूर,
Gayatri Mantra विश्वव्यापी आतंकवाद नष्ट करणे, हिंदुराष्ट्र निर्मिती आणि विश्वशांतीसाठी गायत्री मंत्राचे महाअनुष्ठान पुष्कर, राजस्थान येथे होणार आहे. यापूर्वी, ब्राह्मण महासभा, नागपूर यांच्या वतीने अमृत भवन, अंबाझरी रोड, नागपूर येथे यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. श्री गायत्री शक्ती पीठ (मणीवेदिका पीठ), पुष्कर, राजस्थान येथे दिनांक ८ मार्च २०२६ पासून १९ एप्रिल २०२६ पर्यंत गायत्री पुरश्चरण महायज्ञ आयोजित आहे. गायत्री मंत्र २४ अक्षरी असून, २४ लाख वेळा जपण्याचे हे विशेष अनुष्ठान, ठराविक नियमांचे पालन करून, निश्चित काळात पार पडणार आहे. या कार्यक्रमात २०० कुंड असलेल्या शत (१००) गायत्री पुरश्चरण महायज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे.

nagpur
 
बैठकीत महामंडलेश्वर प्रखर महाराज (मोतीचूर, हरिद्वार, उत्तराखंड) यांनी मार्गदर्शन केले. प्रखर महाराजांचा हिंदी भाषिक ब्राह्मण महासंघ, विश्व हिंदू परिषद, चित्पावन ब्राह्मण संघ, ब्राह्मण सेना, अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ आणि विविध मान्यवरांकडून सत्कार करण्यात आला. आपल्या उद्बोधनात पूज्य स्वामी प्रखर जी महाराज यांनी विविध धार्मिक ग्रंथांचे पुरावे देत देव-देवता आणि ब्राह्मण यांच्यातील संबंध स्पष्ट केले. Gayatri Mantra त्यांनी गायत्री मंत्राच्या महात्म्याचे वर्णन करत पुष्कर येथे होणाऱ्या विशेष अनुष्ठानासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन केले. तसेच आध्यात्मिक प्रगतीसाठी जप, ध्यान, तपश्चर्या, साधना यांचे महत्त्व सांगितले आणि विशिष्ट फलप्राप्तीसाठी गायत्री मंत्राचे अनुष्ठान आवश्यक असल्याचे नमूद केले. कार्यक्रमात जितेंद्र शर्मा यांनी आभार प्रदर्शन केले आणि पसायदानाने सांगता करण्यात आली.
सौजन्य: उमाकांत रानडे, संपर्क मित्र