वस्तीतील कचऱ्यामुळे नागरिक त्रस्त

    दिनांक :11-Mar-2026
Total Views |
नागपूर,
Nagpur News ज्ञानयोगी श्रीकांत जिचकार चौकाजवळील वस्तीतील रहिवासी अनेक वर्षांपासून परिसरातील कचऱ्यामुळे त्रस्त आहेत. रहिवासी म्हणतात की कचरा लहान चौकाजवळच जमलेला आहे, त्यामुळे वास त्रासदायक आहे आणि पार्किंगसाठी जागाही उपलब्ध नाही. काही वेळा डुकरही त्या परिसरात येऊन बसलेली आढळतात.
 
nagpur cha kachra
 
नागरिकांनी ‘स्वच्छ नागपूर, सुंदर नागपूर’ अभियानाबाबत चिंता व्यक्त केली आहे आणि प्रशासकीय यंत्रणेकडे लक्ष देण्याची विनंती केली आहे. Nagpur News त्यांनी विचारले की, घंटागाडी नियमित येत नाही का? आणि कोणीतरी नगरसेवकांना या समस्येची माहिती देऊन उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे.
सौजन्य: रेखा दंडिगे, संपर्क मित्र