तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
pistol-holder-detained : शहरात अवैधरित्या अग्नीशस्त्र (पिस्तुल) बाळगणाèया आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतले आहे. ही कारवाई गुरुवार, 11 मार्च रोजी करण्यात आली. पोलिस पथक पेट्रोलिंग करत असताना मिळालेल्या माहितीवरूनएक व्यक्ती पांढèया रंगाचा टी-शर्ट व पॅन्ट घालून, कमरेला अवैध पिस्तुल (अग्निशस्त्र) खोचून भाग्यनगर डोर्ली परिसरात फिरत आहे, अशी माहिती मिळाल्याने पोलिस पथक भाग्यनगर डोर्ली परिसरात जाऊन मंगेश पान सेंटर समोर एक व्यक्ती संशयास्पद स्थितीत दिसून आला. त्यास शिताफीने पोलिस पथकाने ताब्यात घेऊन त्याचे नाव, पत्ता विचारले असता त्याने इजाज शेख हसन शेख (34, कुरेशीपुरा, यवतमाळ) असे सांगितले.
त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेला खोचून असलेली अंदाजे 50 हजार रुपये किंमतीची एक स्टीलची पिस्तुल (अग्निशस्त्र) मिळून आली. त्यावेळी त्याला हे शस्त्र बाळगण्याचा परवाना आहे किंवा कसे, याबाबत विचारणा केली असता त्याने कोणताही परवाना नसल्याचे सांगितले.
त्यावरून इजाज शेखविरुद्ध यवतमाळ शहर पोलिस ठाण्यात भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा नोंद करून त्याला शस्त्रासह पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून, पुढील तपास यवतमाळ शहर पोलिस ठाणे करीत आहे. ही कारवाई सहायक पोलिस निरीक्षक दत्ता पेंडकर, धनराज हाके, सुनील खंडागळे, सुधीर पांडे, नीलेेश निमकर, सुधीर पिदुरकर, रजनीकांत मडावी, नरेश राऊत यांनी पार पाडली.