बजाजनगरमधील सेलेस्टियर कॅफेवर पोलिसांची धाड

सुगंधित तंबाखू आणि हुक्क्याचा साठा जप्त, चौघांना अटक

    दिनांक :11-Mar-2026
Total Views |
अनिल कांबळे
नागपूर,
police raid शहरातील बजाजनगर चौकात असलेल्या सेलेस्टियर कॅफेवर पोलिसांनी सोमवारी रात्री उशिरा छापा टाकून प्रतिबंधित सुगंधित तंबाखू आणि हुक्क्याचा मोठा साठा जप्त केला आहे. या कारवाईत कॅफे मालकासह चौघांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 

सेलेस्टियर कॅफेवर पोलिसांची धाड 
 
माहितीनुसार, बजाजनगर चौकातील या कॅफेमध्ये छुप्या पद्धतीने हुक्क्याचा अड्डा चालवला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सोमवारी रात्री १२ वाजेच्या सुमारास पोलिसांनी तिथे छापा टाकला. कॅफेमधील एका विशेष खोलीत ६ टेबलवर ग्राहकांना सरकारद्वारे प्रतिबंधित केलेला सुगंधित तंबाखू आणि विविध द्र्रवरुपातील हुक्का पुरवला जात असल्याचे उघड झाले.police raid पोलिसांनी या प्रकरणी अमित भीमदेव इंगळे (मालक, ३५, झिंगाबाई टाकळी), अभय प्रमोद राव (व्यवस्थापक, ३४, छावणी), सचिन अशोक भांडे (कर्मचारी, २७, रामनगर) आणि आदित्य अनिल पेंडके (३०, रेशीमबाग रोड) या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या छाप्यात पोलिसांनी हुक्का साहित्य, प्रतिबंधित फ्लेवर्स, तंबाखुसाठा असा मिळून लाखोंचा मुद्देमाल जप्त केला आहे.