नागपूर,
Public Relations Office inaugurated भारतीय जनता पार्टी, प्रभाग १६ च्या वतीने रामकृष्ण नगर समाज भवन, त्रिकोणी पार्क परिसर येथे नगरसेवक जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन रविवार, कार्यालयाचे उद्घाटन ज्येष्ठ नेते राजीव हडप यांच्या शुभहस्ते करण्यात आले, तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आमदार संदीप जोशी यांनी भूषविले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेविका लक्ष्मी यादव, नगरसेविका वर्षा चौधरी, नगरसेवक लखन येरवार, नगरसेवक सुनील दांडेकर तसेच धंतोली मंडळाचे अध्यक्ष विनोद शिंदे उपस्थित होते.
जनतेच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी बीजेपीचे जनसंपर्क कार्य सोमवार, बुधवार आणि शुक्रवार रोजी सकाळी ८:०० ते ९:३० या वेळेत सुरू राहणार आहे. Public Relations Office inaugurated प्रभाग १६ चे अध्यक्ष गजानन निशितकर यांनी प्रभागातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध आघाड्यांचे अध्यक्ष व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन केले.
सौजन्य: राहुल जोशी, संपर्क मित्र