स्ट्रेट ऑफ होर्मुजम बंद; भारताचा मास्टर स्ट्रोकने ऊर्जा पुरवठा सुरक्षित

    दिनांक :11-Mar-2026
Total Views |
नवी दिल्ली, 
strait-of-hormuz-closed इराण आणि इस्रायल- अमेरिका यांच्यात सुरु असलेल्या युद्धाचा थेट परिणाम भारतावर जाणवू लागला आहे. इराणने आपल्या बचावाच्या रणनितीसाठी आखाती देशांमधील तेल रिफायनरीजवर हल्ले सुरु केले आहेत, तर स्ट्रेट ऑफ होर्मुजमधून वाहतूक होणाऱ्या जहाजांवरही लक्ष्य केले जात आहे. या दोन्ही कारणांमुळे पुढील काही दिवसात भारताला तेल आणि एलपीजी गॅसच्या तुटवड्याचा धोका निर्माण झाला आहे.
 
strait-of-hormuz-closed
 
भारताची जवळपास ४० टक्के कच्चा तेलाची गरज स्ट्रेट ऑफ होर्मुजमधून येते, तर जागतिक पातळीवर अंदाजे २० टक्के तेल या मार्गातून वाहते. त्यामुळे इराणकडून वाहतूक ठप्प झाल्याने भारताचा ऊर्जा पुरवठा गंभीर अवस्थेत आला आहे. संकट पाहून अमेरिकेने भारताला रशियाकडून ३० दिवसांसाठी तेल खरेदी करण्याची परवानगी दिली आहे. strait-of-hormuz-closed त्यानुसार भारताने रशियाकडून ३० मिलियन बॅरल तेल खरेदी केले आहे. मागील काही महिन्यांत रशियाकडून तेलाच्या सवलतीच्या दरांमुळे ही खरेदी रेकॉर्ड पातळीवर झाली आहे.
भारताच्या या खरेदीमुळे रशियाला युक्रेनच्या युद्धात बळ मिळत असल्याचे सांगितले जाते. काही दिवसांपूर्वी भारत-अमेरिकेच्या ट्रेड डीलनंतर अमेरिकेने भारतावर २५ टक्के अतिरिक्त टॅरिफ लावला होता, जो आता मागे घेतला गेला आहे. strait-of-hormuz-closed या परिस्थितीमुळे भारतीय तेल कंपन्यांनी आशियाई समुद्रात उभ्या असलेल्या कार्गोकडून तत्काळ तेल खरेदी सुरु केली आहे. ऊर्जा संकटाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय भारतासाठी मोठ्या प्रमाणावर सोयीस्कर ठरणार आहे, आणि एलपीजी तसेच तेल पुरवठा सुरक्षित ठेवण्यास मदत करेल.