लाखांदू,
Anil Raut अत्यंत किळसवाण्या आणि शिक्षकांची प्रतिमा मलीन करणाऱ्या घटनेने काल भंडारा जिल्हा हादरला. वर्ग खोलीचे दार बंद करून पाच शाळकरी मुलींसोबत घृणास्पद कृत्य करणाऱ्या जिल्हा परिषदेच्या शिक्षकाचे पितळ उघडे पडले. त्यानंतर त्याचे काही प्रताप पुढे आले असून त्याने शिक्षक असलेल्या मित्राच्या मुलीलाच आपल्या विकृत मानसिकतेचे शिकार बनविल्याचे उघड झाले आहे. यासाठी त्याला 3 वर्षाची तुरुंगवासाची शिक्षाही झाली होती.
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा वडेगाव येथील विकृत मनोवृत्तीचा शिक्षक अनिल जगन राऊत (५४) याने शाळेतील पाच चिमुकल्या विद्यार्थिनीसोबत अनैसर्गिक कृत्य केल्याची घटना उघड झाल्यानंतर सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. या विकृत मनोवृत्तीच्या शिक्षकाला गावकऱ्यांनी चांगला चोप दिल्यानंतर पवनी पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत.
या घटनेनंतर या विकृत शिक्षकाचे अनेक प्रताप पुढे येत आहेत. पुढे आलेल्या अशा अनेक घटनांवरून या विकृत शिक्षकाला अश्लील कृत्याचे व्यसन लागले होते असेच म्हणता येईल.अनिल राऊत वडेगाव येथील शाळेत रुजू झाला तेव्हापासून तो मुलींचे शोषण करीत असल्याची धक्कादायक माहिती आता समोर आली आहे. मात्र धास्तावलेल्या मुलींना धमकी देऊन त्याने त्यांचे तोंड बंद केले होते.
वडेगाव येथील जिल्हा परिषद शाळा ही Anil Raut द्विशिक्षकी असून तेथे एक मुख्याध्यापक आणि शिक्षक अनिल राऊत असे दोघेजण कार्यरत आहेत. मागील दोन वर्षांपासून अनिल राऊत हा मुलींसोबत अश्लील कृत्य करीत होता. मुख्याध्यापकाच्या खोलीच्या अगदी बाजूच्या खोलीत दोन वर्षांपासून राऊत विद्यार्थिनीसोबत असे चाळे करत असताना मुख्याध्यापक अगदीच अनभिज्ञ असणे हे अनाकलनीय आहे. अनिल राऊत हा काही वर्षांपूर्वी गोंदिया जिल्ह्यातील एका जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होता. त्यावेळी देखील त्याने शाळेतील एका विद्यार्थिनी सोबत असाच गैरप्रकार केला होता. पालकांच्या तक्रारीनंतर राऊत याला शाळेतून बडतर्फ करण्यात आले होते.
गोंदिया येथील शाळेत बडतर्फ Anil Raut झाल्यानंतर आरोपी शिक्षक अनिल राऊत याने आयुक्तांकडे अपील केली होती, त्यानंतर अपर आयुक्तांनी अंशतः दोषी असा शेरा देत २०१२ मध्ये राऊत याचे निलंबन रद्द केले. त्यानंतर अनिल राऊत हा लाखांदूर तालुक्यातील गवराळा येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक पदी रुजू झाला. २०१८ मध्ये याने एका आठव्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनीचे शोषण केले. उल्लेखनीय म्हणजे ही विद्यार्थिनी राऊत याच्या मित्राची मुलगी होती. मुलीने तिच्यावर झालेल्या अत्याचाराची कहाणी सांगितल्यानंतर संतापलेल्या पालकांनी लाखांदूर पोलीस ठाण्यात शिक्षकांनाराधम शिक्षकाविरोधात तक्रार दिली
लाखांदूर तालुक्यात Anil Raut असताना महाशयांचे ४ प्रताप उघड झाले आहेत. लहान विद्यार्थिनीसोबत घाणेरडे चाळे करण्याचे व्यसनच त्या शिक्षकाला लागल्याचे स्पष्ट होते. लाखांदूर तालुक्यातील मळेघाट येथे शाळेतील मुलींची पाच वर्षांपूर्वी असाच प्रकार त्याने केला होता. पालकांच्या तक्रारीवरून त्या शिक्षकाची बदली गवराळा येथे करण्यात आली. तेथेही अशाच स्वरूपाच्या तक्रारी त्याच्या विषयी झाल्या. केवळ शाळेतील विद्यार्थ्यांनी सोबतच नव्हे, तर या शिक्षकाने त्याचे सहकारी असलेल्या एका शिक्षकाच्या मुली सोबतही लाखांदूर येथे हा प्रकार केला होता. या सर्व गुन्ह्यांची नोंद लाखांदूर पोलीस ठाण्यात आहे. प्रकरणात तीन वर्ष तुरुंगवास भोगला आल्याचीही माहिती आहे. या प्रतापानंतर निलंबित झालेल्या अनिल राऊत याची तुमसर पंचायत समिती बदली झाली, तेथून वर्षभरापूर्वी पवनी पंचायत समितीतील वडेगाव येथे बदली झाली होती असे समजते.
एवढ्या मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी इतिहास असतानाही या शिक्षकाला पुन्हा नोकरीत सामावून कसे घेतले गेले हा प्रश्न पडतो. अश्लीलतेचे व्यसन लागलेल्या या शिक्षकाची पार्श्वभूमी माहिती असताना शिक्षण विभागातील अधिकारी त्याकडे डोळेझाक करत असतील तर मात्र हा विषय नक्कीच गंभीर म्हणावा लागेल.
चौकट
13 पर्यंत पोलीस कोठडी
आरोपी शिक्षक अनिल राऊत याला पवनी पोलिसांनी आज न्यायालयात हजर केले. न्यायालयाने 13 मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.