प्रलंबित मागण्यांसाठी विमाशि संघाचे जिपसमोर धरणे

    दिनांक :11-Mar-2026
Total Views |
वर्धा, 
vidarbha-secondary-teachers-unions : विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ जिल्हा वर्धाचे वतीने शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांच्या प्रलंबित समस्या निवारणार्थ जिल्हा परिषद कार्यालय समोर आज ११ रोजी धरणे आंदोलन करण्यात आले.
 
 
 
kl
 
 
 
शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांना सरसकट जुनी पेन्शन योजना लागू करावी. टी. ई. टी. ची अट रद्द करावी. संच मान्यताबाबतचा १५ मार्च २०२४ चा शासन निर्णय रद्द करावा. राज्य शासकीय कर्मच्यार्‍यांप्रमाणे शिक्षकांना १०-२०-३० वर्षाची आश्वासित प्रगती वेतन योजना लागू करावी. अंशतः अनुदानित शाळांना तात्काळ अनुदान मंजूर करावे. शिक्षकांची सर्व रित पदं तात्काळ भरावे. शिक्षकांना शासन निर्णयानुसार अशैक्षणिक कामातून मुत करा. शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांच्या शालार्थ आयडी प्रदान करा, विद्यार्थी हितासाठी कमी पटसंख्येच्या शाळा बंद करू नये. खाजगी इंग्रजी शाळांतील शिक्षक कर्मचार्‍यांना नियमानुसार वेतन व सेवा नियम लागू करण्यात यावे आदी मागण्या करण्यात आल्या. आंदोलनाचे नेतृत्व शिक्षक आ. सुधाकर अडबाले, जयप्रकाश थोटे, विष्णू इटनकर, माजी शिक्षक आमदार व्ही. यू. डायगव्हाणे यांनी केले.