मुंबई,
pandharpur-and-shirdi देशभरातील एलपीजी गॅस तुटवडा युद्धाच्या पार्श्वभूमीवर गंभीर झाला आहे. इराण आणि इस्रायल- अमेरिका युद्धामुळे मुख्य ऊर्जा पुरवठादार देशांतील रिफायनरीवर हल्ले सुरू आहेत, तसेच स्ट्रेट ऑफ होर्मुजमधून तेल आणि गॅस वाहतूक प्रभावित झाली आहे. यामुळे भारतात घरगुती आणि व्यावसायिक गॅसची टंचाई निर्माण झाली आहे. सरकारने घरगुती गॅसच्या पुरवठ्याचे नियमन करण्यासाठी एस्मा कायदा लागू केला आहे. घरगुती गॅस सिलिंडरची किंमत ६० रुपयांनी वाढल्याची माहिती आहे. महाराष्ट्रातील प्रसिद्ध धार्मिक स्थळेही या संकटाच्या प्रभावाखाली आली आहेत. शिर्डी आणि पंढरपूर यांसारख्या स्थळांवर अन्नछत्र चालवण्यासाठी गॅस पुरवठा सुनिश्चित करण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

पंढरपूरातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने अन्नछत्रात गॅसची कमतरता भासू नये म्हणून गॅस एजन्सीबरोबर बैठक घेतली आहे. भविष्यात गॅस तुटल्यास पारंपरिक चूल आणि डिझेल शेगडीच्या माध्यमातून अन्न शिजवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी विश्वास व्यक्त केला की भाविक उपाशी राहणार नाहीत आणि अन्नछत्र अविरत सुरू राहणार आहे. कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने व्यावसायिक गॅस पुरवठा पूर्णपणे बंद केल्यामुळे अंबाबाई परिसरातील खाद्य स्टॉलवर परिणाम होत आहे. pandharpur-and-shirdi काही स्टॉलमध्ये आजच्या दिवस पुरेल इतकाच गॅस साठा उरलेला आहे, त्यामुळे काही स्टॉल उद्यापासून बंद होण्याची शक्यता आहे. शिर्डी साईबाबा संस्थानने भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी आधीच पुरेशा प्रमाणात गॅस खरेदी केली आहे. सध्या संस्थानमध्ये सुमारे २० टन गॅस साठा उपलब्ध असून, पुढील किमान २० दिवस गॅसची कमतरता भासणार नाही. सौर ऊर्जा प्रकल्पाचा वापर भात आणि डाळ शिजवण्यासाठी केल्यामुळे दररोज २०० किलो गॅसची बचत होत आहे, ज्यामुळे प्रसादालयाला मोठा दिलासा मिळाला आहे.