पुसद,
कठोर परिश्रम, जिद्द आणि कुटुंबाच्या पाठिंब्यामुळे पुसद येथील Parimal Yadav परिमल गोपाल यादव यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे पोलिस उपनिरीक्षक पदासाठी निवड झाली आहे. त्यांच्या या कामगिरीमुळे पुसद शहर आणि परिसरात आनंदाचे वातावरण आहे. अलीकडेच बेलापूर येथील कार्यालयात गट ब पदांसाठी मुलाखत प्रकि‘या पार पडली. या भरती प्रकि‘येत एकूण २१६ पदे उपलब्ध होती. गुरुवारी संध्याकाळी जाहीर झालेल्या निकालात परिमल यादव यांनी पोलिस उपनिरीक्षक पद यशस्वीरित्या मिळवले. यापूर्वी परिमल यादव यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण केली होती. ते सवाना येथील ग‘ामीण रुग्णालयात तृतीय श्रेणी सेवा लिपिक कार्यरत होते. आता त्यांची पोलिस उपनिरीक्षक पदावर नियुक्ती झाल्यानंतर कुटुंबात आनंदाची लाट पसरली आहे.
हरी रामायण मंडळातर्फे Parimal Yadav परिमल यादव यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. मंडळाच्या वतीने कृषीभूषण दीपक आसेगावकर यांनी त्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला, तर आसेगावकर कुटुंबाच्या वतीने परिमल यांचा भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात परिमलच्या मित्रांनी वसंत नगर ते शिवाजी चौकापर्यंत मिरवणूक काढली. परिमल यादव एका सामान्य कुटुंबातून आहेत. त्यांची आई अर्चना यादव व वडील गोपाळ यादव हे दोघेही जिल्हा परिषद शाळेत शिक्षक आहेत. परिमलने त्याचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पुसदमध्ये पूर्ण केले. लहानपणापासूनच त्याने अभ्यासासोबतच स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यावर लक्ष केंद्रित केले. शहरातील विविध सामाजिक, शैक्षणिक व राजकीय वर्तुळातील लोकांनी परिमल यादवचे अभिनंदन केले आहे.