मुंबई विधानभवनात बॉम्बने उडविण्याची धमकी!

पोलिसांनी शोध मोहीम सुरू

    दिनांक :12-Mar-2026
Total Views |
मुंबई,
Bomb threat at Mumbai Vidhan Bhavan मुंबईतील विधानभवन कार्यालयाच्या अधिकृत साईटवर अज्ञात व्यक्तीकडून धमकीचा ई-मेल पाठवल्याची माहिती मिळाल्यानंतर परिसरात तणाव निर्माण झाला आहे. या धमकीनंतर पोलिसांनी विधानभवनात सर्च ऑपरेशन सुरू केले असून, कर्मचाऱ्यांना आतून बाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे.
 
 
Bomb threat at Mumbai Vidhan Bhavan
 
सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री आणि इतर महत्त्वाचे अधिकारी परिसरात असतात. त्यामुळे पोलिसांनी परिसर पूर्णपणे सुरक्षित करण्यासाठी शोध मोहीम त्वरित सुरू केली आहे. सर्च ऑपरेशन पूर्ण होईपर्यंत कोणालाही आत प्रवेश दिला जाणार नाही, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. मिळालेल्या ई-मेलची पडताळणी सुरु असून धमकीची गंभीरता समजून घेण्यासाठी तज्ज्ञांची मदत घेतली जात आहे. परिसरात तासन्तास सुरक्षा बंदोबस्त ठेवल्या आहेत आणि बाहेरून येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर कडक तपासणी केली जात आहे.