मॅरेथॉन १५ मार्चला

    दिनांक :12-Mar-2026
Total Views |
नागपूर, 
शहरातील प्रतिष्ठित 'Bre N Beyond' ‘ब्रे एन बियाँड’ नागपूर मेरेथॉन २०२६च्या १०व्या आवृत्तीत भारतीय फुटबॉल दिग्गज व माजी राष्ट्रीय संघाचा कर्णधार बायचुंग भुतिया प्रमुख पाहुणे असतील.
 
 
bhutiya
 
'Bre N Beyond'  ही मॅरेथॉन १५ मार्चला सिव्हिल लाईन्स येथील सेंट उर्सुला गर्ल्स हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय येथे होणार आहे. मॅरेथॉन ३, ५, १० व २१ किमी अंतराची असून सर्व वयोगटातील स्पर्धक सहभागी होतील. या स्पर्धेत २० भाग्यवान धावपटूंना भुतिया यांची स्वाक्षरी केलेले फुटबॉल मिळतील. नागपूरकरांसाठी ही एक भव्य क्रीडा स्पर्धा ठरणार आहे.