स्पॉट बुकिंग व कापूस खरेदी केंद्र सीसीआयकडून बंद
झरीजामनी,
झरी तालुक्यात CCI Cotton Purchasing Center Tuljapur सीसीआय कापूस खरेदी केंद्र तुळजापूर व येथे असून दोन्हीही कापूस खरेदी केंद्र मागील काही दिवसांपासून कर्मचार्यांच्या हलगर्जीपणामुळे बंद आहेत. ही कापूस खरेदी केंद्र तत्काळ चालू करण्यात यावे यासाठी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष संदीप बुरेवार यांच्या नेतृत्वात तहसीलदार अक्षय रासने यांच्याकडे निवेदनातून मागणी केली आहे. तालुक्यात अनेक कापूस खरेदी केंद्र असून सीसीआयचे मात्र दोनच खरेदी केंद्र आहे. खरेदी केंद्रामध्ये स्पॉट बुकिंग कधी चालू कधी बंद करीत असल्याचा प्रकार तेथील कर्मचार्याकडून वारंवार होत असल्याने तालुक्यातील अनेक शेतकर्यांचा कापूस त्यांच्या घरीच पडून आहे.
२५ दिवसाच्या खरेदीमध्ये नऊ दिवस CCI Cotton Purchasing Center Tuljapur कापूस खरेदी केंद्र बंद होते. तर सोळा दिवसांमध्ये केवळ ७८५ क्विंटलची खरेदी करण्यात आली. कापूस खराब आहे, असे सांगून शेतकर्यांना केंद्रावरून परत पाठवण्याचा प्रकार होत असल्याचे निवेदनात नमुद करण्यात आले आहे. केंद्र सरकारने १५ मार्चपर्यंत कापूस खरेदी केंद्राला मुदतवाढ दिली आहे. परंतु ती मुदतवाढ न ठेवता शेवटच्या बोंडापर्यंत कापूस खरेदी करण्यात यावी असेही मागणी करण्यात आली. तेव्हा तत्काळ कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात यावे अन्यथा रास्ता रोको आंदोलन करण्यात असा इशारा युवक काँग‘ेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी निवेदनातून दिला आहे. यावेळेस कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती राजू कासावार, प्रकाश कासावार, प्रकाश मॅकलवार, सुरेंद्र गेडाम, तालुका उपाध्यक्ष भगवान चुकलवार, विठ्ठल गीजेवार, गंगाधर आत्राम, सुभाष कुडमेथे, नागोराव उरवते, मिथुन सोयाम, वसंत राडेवार, देवराव जिद्देवार, दत्ता बडगेवार, गणपत मोरेवार, शिवदास पुरके, नंदू नामदेव दूधबावणे, बापूराव जिंनावार, पिंटू पोतराजवार, टीना कावडे, शुभम तुडमवार व काँग‘ेस कार्यकर्ते मोठ्या सं‘येने उपस्थित होते.