१८ मार्च अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत
कारंजा लाड,
District Central Cooperative Bank Elections जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू असून, उमेदवारी अर्ज माघारीची अंतिम मुदत अद्याप बाकी असतानाच प्रचाराला वेग आला आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी १८ मार्च ही अंतिम मुदत निश्चित करण्यात आली असून त्यानंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.
District Central Cooperative Bank Elections सध्या विविध गटांमध्ये इच्छुक उमेदवारांनी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. कार्यकर्त्यांच्या बैठका, प्रतिनिधींशी संपर्क तसेच राजकीय घडामोडींमुळे निवडणूक वातावरण तापू लागले आहे. अंतिम मुदतीपूर्वी काही उमेदवार माघार घेण्याची शयता व्यक्त केली जात असल्याने सर्वांचे लक्ष आता माघारीच्या प्रक्रियेवर लागले आहे. दरम्यान, कारंजा तालुयातील एका जागेसाठी सहा उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने सेवा सहकारी सोसायटी मतदार संघात चुरस वाढली आहे. सध्या सर्व उमेदवारांकडून मतदारांशी संपर्क वाढविण्यावर भर दिला जात असून, विविध पॅनलकडूनही आपापल्या उमेदवारांच्या विजयासाठी रणनीती आखली जात आहे.माघारीची मुदत संपल्यानंतर किती उमेदवार अंतिम रिंगणात राहतात, यावर निवडणुकीचे समीकरण अवलंबून राहणार आहे. त्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला असून, स्थानिक पातळीवर चर्चांना उधाण आले आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीला सहकार क्षेत्रात मोठे महत्त्व असल्याने या निवडणुकीकडे जिल्ह्यातील राजकीय व सहकार क्षेत्रातील नेत्यांचेही विशेष लक्ष लागले आहे. माघारीनंतर उमेदवारांची अंतिम यादी जाहीर होताच प्रचार अधिक रंगणार असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.
असे आहेत उमेदवार
जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीत सेवा सहकारी सोसायटी मतदारसंघासाठी कारंजा तालुयातून डहाके दत्तराज, ताथोड विश्वनाथ, कानकिरड रत्नमाला, काळे विजय, वानखडे दिगंबर आणि दहातोंडे अविनाश यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले असून, यातील सर्व उमेदवारी अर्ज छाननी अंती वैध ठरले आहेत.