एकपात्री नाटक व सांस्कृतिक कार्यक्रम
यवतमाळ,
Ekpatri Natak सरकारच्या बाबू जगजीवनराम राष्ट्रीय प्रतिष्ठान सामाजिक न्याय अधिकारीता मंत्रालय सहयोगाने व जय तुळजाई ग्रामीण बहुउद्देशीय स्वयंसेवी संस्थेच्या वतीने मंगळवार, १० मार्च रोजी एकपात्री नाटक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेे. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मृतिदिनानिमित्त स्थानिक बसवेश्वर भवनात आयोजित या कार्यक्रमात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व बाबू जगजीवनराम यांच्या कार्य व माहिती देऊन मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमात यवतमाळ जिल्ह्यातील सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिलांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्ष डॉ. अंजली गवार्ले होत्या.
Ekpatri Natak तसेच प्रिया राजू तोडसाम, क्रांती राऊत, यवतमाळ नगर परिषद बांधकाम सभापती नीता केळापुरे, दर्शना इंगोले, हॉकी डिस्ट्रिक्ट असोसिएशनच्या सचिव मनीषा आकरे, वैशाली खोंड, डॉ. भुयार उपस्थित होत्या. डॉ. अंजली गवार्ले, प्रिया तोडसाम व क्रांती राऊत यांनी उपस्थित महिलांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंबद्दल माहिती दिली. संचालन सुनयना येवतकर यांनी केले. प्रास्ताविक आकाश धुरट यांनी केले. आभारप्रदर्शन उषा खटे यांनी केले. सांस्कृतिक कार्यक्रमात लीना बदुकले, अर्चना सुरेकर, उषा प्रमोद खटे यांनी नाट्यप्रयोग तर सुरेखा भबुतकर यांनी सादर केले. कार्यक्रमाचे आयोजन जय तुळजाई ग्रामीण बहुउद्देशीय स्वयंसेवी संस्थेचे अध्यक्ष पवन धुरट व संस्थेचे प्रकल्प अधिकारी आकाश धुरट यांनी केले.