नागपूर,
Gas cylinder shortage शहरात घरगुती गॅस सिलेंडरचा प्रचंड तुटवडा निर्माण झाल्याची तक्रार ग्राहकांकडून करण्यात येत आहे. काही गॅस गोडाऊनला भेट दिल्यानंतर नागरिकांना एक किलोमीटरपेक्षा जास्त लांब रांगेत तासनतास उभे राहावे लागत असल्याचे चित्र दिसून आले.
ग्राहकांचे म्हणणे आहे की, सिलेंडरची उपलब्धता असतानाही कर्मचारी उद्धटपणे वागत असून नंबर लावल्यानंतरही कार्डधारकांना गॅस कार्यालयातून वेगळी पावती आणण्यास सांगितले जाते. गॅस कार्यालय आणि गोडाऊन यांच्यात दोन ते तीन किलोमीटरचे अंतर असल्याने ग्राहकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.Gas cylinder shortageसिलेंडर वितरण करणाऱ्या डिलिव्हरी बॉयवर कोणतेही नियंत्रण नसल्याची तक्रार नागरिकांनी केली असून काही ठिकाणी काळाबाजार व मनमानी सुरू असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. त्यामुळे ग्राहकांना निश्चित तारखेला गॅस डिलिव्हरी देण्याची व्यवस्था करावी तसेच रात्रीही सिलेंडर वितरण सुरू करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
सौजन्य ;श्रीकांत पवनीकर, संपर्क मित्र