नागरिकांनो पॅनिक होऊ नका, गॅस पुरवठा सुरळीत – एकनाथ शिंदे

    दिनांक :12-Mar-2026
Total Views |
मुंबई,
Gas supply is smooth – Shinde अमेरिका, इस्त्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचा थेट परिणाम आता भारतातही जाणवू लागला आहे. नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर याचा प्रभाव दिसत असून गॅस पुरवठा यंत्रणेला मोठा फटका बसला आहे. व्यावसायिक गॅस सिलेंडर तात्पुरते थांबवल्याने घरगुती गॅस ग्राहकांमध्ये भीती पसरली आहे. शहरी भागातील ग्राहकांना २५ दिवसांनी तर ग्रामीण भागातील दुर्लभ विक्रेत्यांकडे ४५ दिवसांनी गॅस सिलेंडर मिळणार असल्याचे आदेश निघाल्याने ग्राहकांनी एजन्सीसमोर गर्दी केली आहे. मात्र, केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवत आहेत.
 
eknath shinde 
 
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना नागरिकांना अफवांवर विश्वास ठेवू नका असे आवाहन केले. गॅस आणि इंधन पुरवठ्याबाबत केंद्र आणि राज्य सरकार समन्वयाने कार्यरत असून तुटवडा होणार नाही, याची काळजी घेतली जात आहे.उपमुख्यमंत्र्यांच्या म्हणण्यानुसार, गॅस सिलेंडरच्या पुरवठ्यात कुठलाही तुटवडा नाही. ग्रामीण भागातील काही दुर्लभ ठिकाणी ४५ दिवसांचा अंतर असून शहरी भागात २५ दिवसांनी नियमित पुरवठा केला जातो. विविध जिल्ह्यातील तहसीलदार कार्यालयांनी काळाबाजार रोखण्यासाठी विशेष पथक नेमले आहेत. या पथकाद्वारे गॅस एजन्सी आणि गोदामांमध्ये जाऊन ग्राहक कनेक्शन, सिलेंडर संख्या आणि वितरण यंत्रणा तपासली जाते. ग्राहकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असेही आवाहन करण्यात आले आहे.