गर्भलिंग निदान व अवैध गर्भपाताची माहिती एक लाखांचे बक्षीस

    दिनांक :12-Mar-2026
Total Views |
हेल्पलाईन क्रमांक १८००२३३४४७५ जारी

यवतमाळ, 
Illegal abortion राज्यात गर्भधारणा पूर्व व प्रसवपूर्व गर्भलिंग निदान तंत्र कायदा तसेच वैद्यकीय गर्भपात कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. जिल्ह्यात या कायद्याचा भंग होत असल्याचे आढळल्यास कारवाई करण्यात येणार आहे. तसेच कायद्यांच्या उल्लंघनाची माहिती देणार्‍या व्यक्तीस १ लाख बक्षीसही देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक, सामान्य रुग्णालय यवतमाळ यांनी दिली आहे.
 
 
abortion
 
Illegal abortion  मान्यताप्राप्त केंद्रामध्ये वैद्यकीय गर्भपात कायद्याचे उल्लंघन होत असल्यास, गर्भलिंग चाचणी करून अवैधरित्या गर्भपात केले जात असल्यास किंवा अपात्र व्यक्तीकडून गर्भपात केला जात असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक, यवतमाळ यांना कळविण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. अशी मिळाल्यानंतर त्याची खातरजमा करून संबंधित सोनोग्राफी केंद्र, गर्भपात केंद्र किंवा संबंधित व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यावर माहिती देणार्‍या व्यक्तीस प्रत्येकी १ लाख रुपये बक्षीस देण्यात येईल. माहिती देणारी व्यक्ती सामान्य नागरिक, आरोग्य विभागातील कर्मचारी-अधिकारी तसेच इतर शासकीय किंवा निमशासकीय कर्मचारी-अधिकारी असू शकतात. तसेच माहिती देणार्‍या व्यक्तीची ओळख पूर्णपणे गुप्त ठेवण्यात आहे. गर्भधारणा पूर्व व प्रसवपूर्व लिंग निदान कायद्याचा भंग होत असल्याचे आढळल्यास हेल्पलाईन क्रमांक १८००२३३४४७५ वर तक‘ार नोंदवावी किंवा जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय, यवतमाळ येथे कळविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.