इराणने भारताला दिला मोठा दिलासा; होर्मुझमध्ये भारतीय जहाजांना अडवणार नाही

    दिनांक :12-Mar-2026
Total Views |
नवी दिल्ली, 
hormuz-open-for-indian-ships पश्चिम आशियात सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतासाठी दिलासादायक घडामोड समोर आली आहे. इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या भारतीय ध्वज असलेल्या जहाजांना अडवले जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे या मार्गाने जाणाऱ्या भारतीय तेलवाहू जहाजांना सुरक्षितपणे प्रवास करता येणार आहे.
 
hormuz-open-for-indian-ships
 
अमेरिका, युरोप आणि इस्रायलशी संबंधित अनेक जहाजांवर या भागात इराणी नौदलाकडून कारवाई होत असताना भारताच्या जहाजांना मात्र विशेष मुभा देण्यात आली आहे. hormuz-open-for-indian-ships या निर्णयामागे भारताने ठेवलेली संतुलित परराष्ट्र भूमिका महत्त्वाची ठरल्याचे मानले जात आहे. भारतीय परराष्ट्र मंत्री जयशंकर आणि इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अरघची यांच्यात मंगळवारी रात्री दूरध्वनीवर उच्चस्तरीय चर्चा झाली. या चर्चेनंतर इराणने भारतीय ध्वज असलेल्या तेलवाहू जहाजांना होर्मुझच्या सामुद्रधुनीतून सुरक्षितपणे जाण्याची परवानगी देण्यास सहमती दर्शवली.
मिळालेल्या माहितीनुसार ‘पुष्पक’ आणि ‘परिमल’ ही भारताची दोन तेलवाहू जहाजे सध्या या मार्गाने सुरक्षितपणे पुढे जात आहेत. जागतिक जहाज वाहतुकीत या भागात मोठी घट झाली असतानाही भारतीय जहाजांना दिलेली ही मुभा भारतासाठी महत्त्वाची मानली जात आहे. अलीकडेच थायलंडच्या ध्वजाखालील एका जहाजावर हल्ला झाल्याची घटना समोर आली होती. तसेच इतर काही जहाजांनाही अडवण्यात आले किंवा हल्ल्यांना सामोरे जावे लागले. hormuz-open-for-indian-ships या पार्श्वभूमीवर भारतीय जहाजांना मिळालेली ही परवानगी भारताच्या वाढत्या आंतरराष्ट्रीय प्रभावाचे आणि प्रभावी कूटनीतीचे उदाहरण मानली जात आहे.