विद्यार्थ्यांची महालक्ष्मी सरसला शैक्षणिक भेट

    दिनांक :12-Mar-2026
Total Views |
नागपूर,
Jyotiba Secondary School ज्योतिबा लोकमान्य जनकल्याण टिळक संस्था द्वारा संचालित ज्योतिबा माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी रेशीमबाग येथे भरलेल्या ‘महालक्ष्मी सरस’ प्रदर्शनाला शैक्षणिक भेट देत विविध उद्योगांची माहिती घेतली. या भेटीत विद्यालयाच्या प्राचार्या अरुणा कडू व पर्यवेक्षक जे. बी. वांडे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले होते.या प्रदर्शनामध्ये महिला बचत गट व लघुउद्योजिकांनी तयार केलेल्या विविध वस्तूंचे स्टॉल लावण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी हस्तकला वस्तू, घरगुती पदार्थ, कपडे, सजावटीच्या वस्तू तसेच विविध प्रकारच्या ग्रामीण व पारंपरिक उत्पादनांची माहिती प्रत्यक्ष पाहून घेतली.
 
 
nm
 
 
यावेळी प्राचार्या अरुणा कडू यांनी विद्यार्थ्यांना महिला उद्योगांच्या माध्यमातून स्वावलंबन कसे साध्य करता येते, तसेच लघुउद्योगांचे समाजातील महत्त्व काय आहे याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्यांना उद्योजकता, स्वावलंबन आणि कौशल्य विकासाचे महत्त्व समजावून सांगितले.Jyotiba Secondary School  या शैक्षणिक भेटीमुळे विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या वस्तूंची ओळख झाली तसेच महिला उद्योजकांच्या कार्याची माहिती मिळाली. विद्यार्थ्यांसाठी ही भेट ज्ञानवर्धक व प्रेरणादायी ठरली.
सौजन्य: जे. बी. वांडे ,संपर्क मित्र