भजन सत्याग्रहातून वन्यजीव रक्षणाचे साकडे

    दिनांक :12-Mar-2026
Total Views |
’अन्नत्याग सत्याग्रह’चा आठवा दिवस

चंद्रपूर, 
Lohardongri Mining Project लोहारडोंगरी या प्रस्तावित खाण प्रकल्पाविरोधात इको-प्रो संस्थेचे अध्यक्ष बंडू धोतरे यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या अन्नत्याग सत्याग्रहाचा गुरुवारी आठवा दिवस होता. आठ दिवस उलटूनही प्रशासकीय पातळीवर ठोस हालचाली होत नसल्याने उपोषणमंडपात समाजकार्यचे विद्यार्थी आणि विविध संस्थेची पदाधिकारी यांनी भजन सत्याग्रह करून सरकारलाकडे साकडे घातले.
 
 
Lohardongri
 
Lohardongri Mining Project  यावेळी उपस्थित विद्यार्थीनी ‘वैष्णव जन ते न कहिये’, ‘खरा तो एकची धर्म’, ‘हीच आमची प्रार्थना’, ‘हम होगे कामयाब’, ‘तन मन धन से सदा सुखी हो’ आदी भजन आणि प्रार्थना गायल्या. गुरुवारी उपोषणाला छायाचित्रकार बहुउद्देशीय संस्था, मराठा सेवा संघ, बहुजन हितकरिणी सभा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार, भारतीय जीवन बीमा संघटन, रिपाई आठवले गट, महात्मा जोतिबा फुले तथा डॉ बाबासाहेब आंबेडकर विचार संवर्धन समिती, पर्यावरण संवर्धन समिती, पर्यावरण वाहिनी, चंद्रपूर बचाव संघर्ष समिती या संस्था, संघटनांनी समर्थन दिले. आंदोलनस्थळी बंडू नगराळे, अ‍ॅड. तबस्सुम शेख, नागपूर वरून स्वानंद सोनी, उदयन पाटील, श्रीकांत देशपांडे, शाम पांढरीपांडे, अनुसया साबरानी, अ‍ॅड. नीरज खांदेवाले, डॉ. सुशील मुंदडा, प्रा. देवेंद्र बोरकुटे, प्रा. संतोष आडे, प्रा. जयश्री कापसे, प्रा. प्रगती नरखेडकर, बेबी उईके, गोलू बाराहाथे यांनी भेट दिली.