वर्धा,
Marathi Bhasha Gaurav Din मराठी भाषा विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय व माध्यमिक शिक्षण विभागाच्या वतीने वि. वा. शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांच्या जयंती निमित्त शिवशंकर अग्निहोत्री सभागृहात मराठी भाषा गौरव दिनाचे आयोजन करण्यात आले होते. उद्घाटक म्हणून जिपचे मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमन होते तर माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. जयश्री घारफळकर, प्राथमिक शिक्षणाधिकारी रुपेश कांबळे, प्रमुख वता म्हणून जय महाकाली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष पं. शंकरप्रसाद अग्निहोत्री, डॉ. वंदना पळसापुरे, मराठी भाषा गौरव दिन समितीचे संदीप चिचाटे, आशिष पोहाणे, प्रवीण चाळके, मारोती चवरे, पद्माकर बाविस्कर, रत्ना चौधरी, प्राचार्य निळकंठ ढोबाळे आदी उपस्थित होते.
मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण यांनी Marathi Bhasha Gaurav Din मराठी ही महाराष्ट्राची राजभाषा, संत-शूरांची आणि समृद्ध साहित्याची जननी आहे. अमृतातेही पैजा जिंके अशा या भाषेचा गोडवा, ज्ञानदेवांपासून कुसुमाग्रजांपर्यंतच्या साहित्यातून थोरवी गातो. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी म्हणत या संस्कृतीच्या, ज्ञानाच्या आणि आपल्या अस्मितेच्या भाषेचा वापर करून जतन करणे हे आपले कर्तव्य आहे, असे मत व्यत केले.
पं. शंकरप्रसाद अग्निहोत्री यांनी उच्च शिक्षित लोकांच्या विचारांचा लेखा-जोखा म्हणजे साहित्य आहे. साहित्यातून अन्वेषण निर्माण झाले तरच त्यातून भाषेचा आविष्कार घडवून येतो. मराठी ही आपली मायबोली आहे, त्यामुळे आपण आपल्या मायबोलीतच बोलले पाहिजे, असे मत व्यत केले. डॉ. वंदना पळसापुरे यांनी मराठी भाषा व त्याची व्याप्ती, त्याचे संवर्धन, डिजिटल युगात मराठी समोरची आव्हाने यावर प्रकाश टाकला.
Marathi Bhasha Gaurav Din संचालन ज्योती भगत यांनी केले तर आभार संदीप चिचाटे यांनी मानले. यावेळी मराठी साहित्य क्षेत्रातील कवी, गजलकार, लेखक योगेश बडे, महेश महाजन, प्रीती वाडीभस्मे, वृषाली मारतोडे, कविता बेदरकर, तेजस भातकुलकर यांचा सत्कार करण्यात आला. मराठी पाऊल पडते पुढे हा संदीप चिचाटे निर्मित मराठी लोकगीतांचा कार्यक्रम जीवन बांगडे, सानिका बोभाटे, प्रांजली गायकवाड, मयूर पटाईत यांनी सादर केला. गिरीश काळे यांच्या मराठी भाषा हस्तलिखिताचे विमोचन करण्यात आले. याप्रसंगी चित्रकला, निबंध व शोधनिबंध स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले