फुल शेतीतून ६० हजारांचे मासिक उत्पन्न

विजयगोपालच्या शितलचा प्रयोग ठरला प्रेरणादायी

    दिनांक :12-Mar-2026
Total Views |
वर्धा,
flower farming पारंपारिक शेतीला फाटा देत विजयगोपाल येथील शितल गुरूनामसिंह पाकल यांनी फुल शेतीच्या माध्यमातून प्रगतीची कास धरली आहे. पाकल दाम्पत्य फुल शेतीत आंतरपीक म्हणून भाजीपाल्याचेही उत्पादन घेतात. केवळ फुल शेतीतून पाकल दाम्पत्याला मासिक ६० हजारांची कमाई होत असून त्यांचा हा प्रयोग इतरांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
 
 
फुल शेती
 
 
शितल पाकल या उमेदशी जुळून आहेत. त्यांच्याकडे १० एकर शेती आहे. पूर्वी शेतात पारंपारिक पिकांची लागवड केली जायची. पण, कुटुंबात कमविणारे कमी आणि अवलंबून असणारे जास्त असल्याने आणि शितल यांचे सासू-सासरे म्हातारे असल्याने शितल व पती गुयनामसिंह यांच्या खाद्यावर शेतीची जबाबदारी आली. ते दोघेही शेतात राबतात. शेतीवरच कुटुंबाचा गाढा हाकलल्या जात असल्याने त्यांनी फुल शेती करण्याचा निर्णय घेतला. कृषी व्यवस्थापक नलिनी खडकुंबे यांचे त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन लाभले. प्रशिक्षण घेऊन त्यांनी विविध फुल झाडांची लागवड केली. झेंडू, शेवंती, गुलाब, गलांडीया आदी फुल झाडांची त्यांनी टप्प्या टप्प्याने शेतात लागवड केली. मेहनतीच्या जोरावर पाकल दाम्पत्याची फुल शेती सध्या चांगलीच फुलली असून केवळ फुल विक्रीतून ते महिन्याला किमान ६० हजार रुपये कमावत आहेत. तर फुल शेतीत आंतरपीक म्हणून लागवड करण्यात येणार्‍या भाजीपाल्याचे पीक त्यांच्यासाठी बोनस ठरत आहे.
पाकल दाम्पत्य फुलांची विक्री पुलगाव येथील बाजारपेठेत करतात. पाकल कुटुंबाचा उदरनिर्वाह, मुलांचा शिक्षणाचा खर्च फुलाच्या शेतीतून चालतो. तर शेतीतील नगदी पिकांतून मिळालेले उत्पन्न भविष्याची तरतूद म्हणून जमा केली जात आहे. याशिवाय फुलांच्या शेतीतच पालक, मेथी, कोथिंबीर, हळद, मिरची, मुळा ही भाजीपाला वर्गीय पिके घेतली जात आहे. शेतातच केळी व संत्रा, आंबा, चिकू, पेरू, लिंबू, सीताफळ, शेवगा आदीचीही लागवड करण्यात आली आहे. या फळांपासूनही उत्पन्न मिळत आहे.
जोडव्यवसाय म्हणजे शेतीला अनुसरून फुल शेतीचा जोडधंदा केल्यामुळे माझ्या परिस्थितीत कमालीची सुधारणा झाली आहे. शिवाय गावात प्रतिष्ठाही वाढली. उत्पन्नात वाढ झाली असून जीवनमान सुधारले आहे. आगामी काळात आणखी फुल शेतीचे क्षेत्र वाढवायचे आहे.flower farming त्यावर आधारित केवीआयसीमार्फत मधाच्या पेट्यांकरिता प्रयत्न सुरू आहे. जेणेकरून फूल शेतीसोबत मधमाशी पालन केले तर अजून उत्पन्न वाढेल, अशी प्रतिक्रीया शेतकरी शितल पाकल यांनी दिली.