बाल्कनी ते गच्चीपर्यंत बागकामाचे धडे

    दिनांक :12-Mar-2026
Total Views |
नागपूर,
Nagpur Garden Club नागपूर गार्डन क्लब येथे “मूलभूत बागकाम” या विषयावर दोन दिवसीय कार्यशाळा उत्साहात पार पडली. या कार्यशाळेचे प्रमुख वक्ते समित आदमने होते. त्यांनी बागकाम विषयावर आतापर्यंत ५० पेक्षा अधिक कार्यशाळा घेऊन नागरिकांना मार्गदर्शन केले आहे.या कार्यशाळेचा मुख्य उद्देश प्रशिक्षणार्थींना बागकामाची मूलभूत तत्त्वे शिकविणे तसेच घरी आणि परिसरात बागकाम करण्यासाठी प्रोत्साहित करणे हा होता. कार्यशाळेदरम्यान सहभागी प्रशिक्षणार्थींना बागकामाशी संबंधित विविध महत्त्वाच्या बाबींवर सविस्तर प्रशिक्षण देण्यात आले.
 
 
 
ui
 
 
यामध्ये मातीची योग्य तयारी कशी करावी, कुंड्यांमध्ये माती कशी भरावी, झाडांची योग्य निवड कशी करावी, पाणी व खते किती आणि कशा प्रकारे द्यावीत, तसेच झाडांवरील रोग टाळण्यासाठी कोणते प्रतिबंधात्मक उपाय करावेत याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.Nagpur Garden Club विशेषतः ज्यांनी नुकतेच बागकाम सुरू केले आहे अशा प्रशिक्षणार्थींसाठी सोप्या, व्यावहारिक आणि दैनंदिन वापरात येणाऱ्या पद्धती शिकविण्यात आल्या.नागपूरसारख्या शहरात राहूनही घराच्या बाल्कनीत, गच्चीवर किंवा मोकळ्या जागेत छोटेखानी बाग कशी तयार करता येते याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले. त्यामुळे कमी जागेतही हरित वातावरण निर्माण करण्याबाबत सहभागींचा आत्मविश्वास वाढला.या कार्यशाळेत सहभागी प्रशिक्षणार्थींकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. नागपूर गार्डन क्लबकडून अशा प्रकारच्या कार्यशाळांचे नियमित आयोजन करण्यात येत असून शहर अधिक हिरवे व स्वच्छ करण्याबरोबरच नागरिकांमध्ये बागकामाबाबत जागरूकता निर्माण करण्याचा क्लबचा प्रयत्न आहे.
सौजन्य :नितीन दाते,संपर्क मित्र