नागपूर-हैदराबाद महामार्गावर गोवंश तस्करीचा पर्दाफाश

    दिनांक :12-Mar-2026
Total Views |
पांढरकवडा पोलिसांची कारवाई
१७ गोवंशांची सुटका, ५ आरोपी अटक

पांढरकवडा, 
Nagpur-Hyderabad Highway: Cattle smugglers नागपूर-हैदराबाद-राष्ट्रीय महामार्गावर गोवंश तस्करी करणार्‍या वाहनावर पांढरकवडा पोलिसांनी धडक कारवाई करत १७ गोवंशीय सुटका केली. अत्यंत क‘ूर पद्धतीने कोंबून नेण्यात आलेल्या या जनावरांपैकी १४ बैल जिवंत आढळले. तर ३ बैलांचा गुदमरून मृत्यू झाला. या प्रकरणी पाच आरोपींना अटक करण्यात आली असून १७ लाख ५९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
 
 
aropi
 
१० मार्च रोजी पहाटेच्या सुमारास ४ वाजता कोंघारा फाट्याजवळ पोलिसांनी सापळा नागपूरहून हैदराबादकडे जाणारे आयशर वाहन क‘. एमएच४० सीएम३२३० अडवून तपासणी केली. वाहनाची तपासणी करताना जनावरांचे पाय व मान घट्ट बांधलेल्या अवस्थेत अत्यंत क‘ूरपणे कोंबून वाहतूक केली जात असल्याचे आढळून आले. या कारवाईत १५ लाख रुपये किमतीचे वाहन व २ लाख ५९ हजार रुपये किमतीची जनावरे असा एकूण १७ लाख हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. मृत जनावरांचे शवविच्छेदन करून अंत्यसंस्कार करण्यात आले, तर जिवंत १४ बैलांना पांढरकवडा नगरपरिषदेच्या कोंडवाड्यात सुरक्षित ठेवण्यात आले आहे.
 
 
Nagpur-Hyderabad Highway: Cattle smugglers  या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये मोहम्मद रिजवान रफिक शेख, अब्दुल रफिक अब्दुल कादिर कुरेशी, सदू उर्फ सदाम कुरेशी (तिघेही रा. नागपूर), मोहम्मद जुनेद अब्दुल (वणी) व निखिल डोरेले (भंडारा) यांचा समावेश आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक कुमार चिंता व अपर पोलिस अधीक्षक अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक लहु तावरे व त्यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली. या कारवाईमुळे महामार्गावरील गोवंश तस्करांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.