‘एमबीबीएस’ प्रवेशाच्या नावाखाली 14 लाखांची फसवणूक

- हिंगणा एमआयडीसी पाेलिसांत गुन्हा दाखल

    दिनांक :12-Mar-2026
Total Views |
अनिल कांबळे
नागपूर,
mbbs admission fraud डाॅक्टर हाेण्याचे स्वप्न पाहणाèया मुलीला नामांकित वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका व्यक्तीने पालकाची 14 लाख रुपयांनी फसवणूक केली. एमआयडीसी पाेलिस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार उघडकीस आला असून, पाेलिसांनी याप्रकरणी आराेपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
 
 
 
mbbs admission fraud
 
 
माहितीनुसार, संजय महादेवराव धवस (48, गाव संगम, ता. हिंगणा) यांची मुलगी श्रृती हिने बारावी उत्तीर्ण केल्यानंतर तिला वैद्यकीय क्षेत्रात करिअर करायचे हाेते. मात्र, नीट परीक्षेत तिला अपेक्षित गुण मिळाले नव्हते. यादरम्यान तिची ओळख आराेपी निर्मल नयन पांडे (45, मानिकनगर, बेलतराेडी) याच्याशी झाली. आराेपीचे हिंगणा राेडवरील गाडगेनगर येथे कन्सल्टन्सीचे ऑिफस आहे. आराेपीने धवस यांना विश्वास दिला की, त्याची माेठी ओळख असून ताे श्रृतीला दत्ता मेघे वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवून देईल. यासाठी त्याने एकूण 1 काेटी 20 लाख रुपयांची मागणी केली. या आमिषाला बळी पडून संजय धवस यांनी 2 जुलै 2024 ते 28 ेबु्रवारी 2026 या कालावधीत आराेपीला राेख आणि ऑनलाईन स्वरूपात एकूण 14 लाख रुपये दिले. पैसे घेऊनही आराेपीने प्रवेशासाठी काेणतेही प्रयत्न केले नाहीत आणि प्रवेशही मिळवून दिला नाही. परिणामी, संजय धवस यांनी आपले पैसे परत मागितले असता आराेपीने नेहमी टाळाटाळ केली.mbbs admission fraud आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात येताच धवस यांनी पाेलिसांत तक्रार दिली. या तक्रारीवरून एमआयडीसी पाेलिस ठाण्याचे पाेलिस उपनिरीक्षक प्रशांत राऊत यांनी आराेपी निर्मल पांडे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
शेकडाेवर पीडित विद्यार्थी?
आराेपींनी अशाच प्रकारे आमिष दाखवून अनेक विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांची फसवणूक केल्याचा पाेलिसांना संशय आहे. त्यामुळे, पाेलिसांनी या आराेपीने अशा प्रकारे अन्य कुणाची फसवणूक केली असेल किंवा पैसे घेतले असतील तर त्यांनी तात्काळ एमआयडीसी पाेलिस ठाण्याचे वरिष्ठ पाेलिस निरीक्षक जितेंद्र बाेबडे किंवा पाेलिस ठाण्यात यांच्याकडे तक्रार करण्याचे आवाहन केले आहे.