शेडूल वनमध्ये करा सामवेश
आ. कुणावार यांनी व्यत केली तीव्र चिंता
समुद्रपूर,
तालुयात पट्टेदार वाघांनी चांगलाच धुमाकूळ घातला असून वनविभागाने खुर्सापार जंगलातील दोन वाघांना जेरबंद केले. असे असले तरी तालुयातील विविध भागात अजून १० वाघांचा वावर आहे. त्यामुळे बिबट्यांप्रमाणे ‘शेडूल वन’मध्ये पट्टेदार वाघांचा समावेश करून वाघांचा सुद्धा बंदोबस्त करावा, अशी मागणी Sameer Kunawar आ. समीर कुणावार यांनी अधिवेशनादरम्यान सभागृहात वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडे केली आहे.
Sameer Kunawar आ. कुणावार म्हणाले की, समुद्रपूर परिसरात सध्या वाघाचा वाढता वावर नागरिकांसाठी गंभीर चिंतेचा विषय बनला आहे. अनेक गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जवळपास १०० गावांच्या परिसरात वाघांचा वावर असून आतापर्यंत ४६ जनावरांची शिकार केली आहे. सरकार बिबट्याला शेड्यूल—१ मध्ये समाविष्ट करण्याचा विचार करत आहे. त्याच धर्तीवर वाघांच्या संदर्भातही ठोस आणि तातडीचे निर्णय घेण्यात येणार का? असा प्रश्न वनमंत्री गणेश नाईक यांना विचारला. या विषयावर अनेक बैठका, चर्चा झाल्या. परंतु, अद्याप वाघांना पकडण्यासाठी किंवा नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी कारवाई झाली नाही, असेही आ. कुणावार म्हणाले. गेल्या दीड वर्षापासून समुद्रपूर तालुयात जवळपास १२ वाघांचा वावर होता. एकट्या खुर्सापार जंगलात ५ वाघ होते. तर मोहगाव, ताडगाव, खेक, दसोडा जंगलांमध्ये ७ वाघ होते. आ. कुणावार यांनी या वाघांचा बंदोबस्त करण्याची मागणी लावून धरली होती. शेवटी खुर्सापार जंगलातील ५ वाघांना जेरबंद करण्याची परवानगी मिळवून घेतली. यातील दोन वाघांना जेरबंद सुद्धा करण्यात आले. मात्र, अजून १० वाघ शिल्लक असल्याचे नमुद केले.