जगातील पहिला ‘बोलणारा’ श्री गजानन विजय ग्रंथाचे लोकार्पण रविवारी
नागपूर,
संतश्रेष्ठ Shri Gajanan Maharaj श्री गजानन महाराजांच्या जीवनचरित्रावर आधारित जगातील पहिला ’बोलणारा’ श्री गजानन विजय अद्वितीय ग्रंथाचे लोकार्पण रविवार, १५ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात आयोजित करण्यात आल्याची माहिती प्रा. गिरीश देशमुख, महाजन, श्याम पेठकर यांनी पत्रपरिषदेत दिली. यावेळी अमर इंदूरकर, विवेक सुरानी, पवन तिवारी, शशांक विश्वरूपे आदींची उपस्थिती होती.
पापमोचनी एकादशीच्या पवित्र मुहूर्तावर होणार्या या सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी तसेच मुंबईतील प्रसिद्ध उद्योगपती जयंत म्हैसकर, संतनगरी शेगाव येथील महादेव (गणेश) पाटील, जेजुरी देवस्थान संस्थेचे अध्यक्ष मंगेश घोणे, डोंबिवली येथील विद्या पडवळ यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. संतश्रेष्ठ श्री गजानन महाराजांच्या पावन कृपेने आणि केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पना व प्रेरणेतून महाराजांच्या जीवनचरित्रावर आधारित पहिला ’बोलणारा’ श्री गजानन विजय ग्रंथ होय.
महाराजांचे जीवन आणि प्रेरणा
Shri Gajanan Maharaj संतश्रेष्ठ श्री महाराज हे महाराष्ट्रातील कोट्यवधी भक्तांचे आराध्य दैवत आहेत. त्यांच्या जीवनातील चमत्कारिक लीला, आध्यात्मिक संदेश, भक्तांवरील कृपा आणि जीवनदर्शन अनेक पिढ्यांना प्रेरणा दिली आहे. या महान संतांचे विचार आणि जीवनचरित्र नव्या पिढीपर्यंत आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने प्रभावीपणे पोहोचावे, तसेच भक्तांना वाचनाबरोबरच श्रवणातूनही आध्यात्मिक अनुभव मिळावा, या उद्देशाने ’राजराजेश्वरी’ हा अभिनव बोलणारा साकारण्यात आला आहे. परंपरागत पोथी वाचन आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा संगम साधत भक्तांना एक वेगळा आध्यात्मिक अनुभव हा प्रयत्न मानला जात आहे.
या ग्रंथाची वैशिष्ट्ये
- पाचशे पानांचा हा आकर्षक ग्रंथ ऐकण्यासाठी गजानन वीणा या विशेष यंत्राच्या सहाय्याने संपूर्ण ग्रंथ मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तीन भाषांमध्ये ऐकण्याची सुविधा श्री गजानन विजय ग्रंथातील २१ अध्याय सुरेल धूनमध्ये संगीतबद्ध ऐकता येते. प्रत्येक अध्यायाच्या प्रारंभी भक्तिमय २१ भजने आहे. महाराजांच्या लीलांचे दर्शन घडविणारी सुमारे २५० सुंदर व भावस्पर्शी चित्रे यात आहे. प्रत्येक अध्यायाचे सोप्या भाषेत निरूपण आणि बोध आहे. मोबाईल अॅप डाउनलोड करून कुठेही व कधीही ग्रंथ ऐकण्याची सुविधा आहे.
निर्मितीसाठी अनेकांचे योगदान
या ग्रंथाची निर्मिती इंस्टाग्रोथ मर्चेंडाइज एलएलपी या संस्थेमार्फत करण्यात आली आहे. या प्रकल्पात संजय जैन, गिरीश देशमुख, इंदुरकर आणि उमेश महाजन यांचे विशेष योगदान आहे. Shri Gajanan Maharaj ग्रंथाचे लेखन व क्रिएटिव्ह डायरेक्शन श्याम पेठकर, भाग्यश्री पेठकर यांनी केले आहे. संगीत विरेंद्र लाटणकर यांनी दिले असून संगीत नियोजन पवन यांनी केले आहे. चित्रांकन उमेश चारोळे आणि संजय मोरे यांनी केले आहे. निर्मिती व्यवस्थापन अजय बिवडे यांनी सांभाळले आहे.
पाच भक्तांना मिळणार हा ग्रंथ
सुरेश भट सभागृहात कार्यक्रम स्थळी उपस्थित झालेल्या गजानन भक्तांसाठी एक विशेष योजना आम्ही आखली आहे. तिथे आलेल्या प्रत्येक भक्ताकडून त्यांची माहिती भरून घेतली जाईल. कार्यक्रमातच ईश्वर चिट्ठी द्वारे निघालेल्या पाच भाग्यवान गजानन भक्तांना पाहुण्यांच्या हस्ते हा अद्भुत ग्रंथ महाराजांचा प्रसाद म्हणून भेट दिला जाईल.