सेंट फ्रान्सिस स्कूलच्या बसमध्ये विद्यार्थ्यास अमानुष मारहाण

    दिनांक :12-Mar-2026
Total Views |
अहेरी, 
नागेपल्ली येथील नामांकित St. Francis School Bus सेंट फ्रान्सिस स्कूलच्या बसमध्ये एका विद्यार्थ्याला बस कंडक्टरने अमानुषपणे मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे पालकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे मिळालेल्या माहितीनुसार, सेंट फ्रान्सिस स्कूलची बस विद्यार्थ्यांना सोडून परत जात असताना ही घटना घडली. बसमधील एका विद्यार्थ्याने काहीतरी खोडसाळपणा केला किंवा गोंधळ घातला, या कारणावरून बसवरील कंडक्टरने रागाच्या भरात त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. मारहाण इतकी गंभीर होती की, कंडक्टरने विद्यार्थ्याचा गळा दाबून त्याला धमकावल्याचे बोलले जात आहे.
 
 
school
 
St. Francis School Bus  विद्यार्थी घरी पोहोचल्यानंतर त्याने घडलेला प्रकार आपल्या पालकांना सांगितला. मुलाच्या अंगावर मारहाणीच्या खुणा पाहून आणि गळा दाबल्याची हकीकत ऐकून पालक हादरून गेले. पालकांनी तत्काळ शाळेच्या प्रशासनाकडे धाव घेत आपला संताप व्यक्त केला. शाळेच्या बसमध्ये विद्यार्थी सुरक्षित नसतील, तर पाठवायचे कसे? असा संतप्त सवाल पालकांनी उपस्थित केला आहे. याप्रकरणी शाळा प्रशासनाने संबंधित कंडक्टरवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी पालकांनी लावून धरली आहे. या घटनेमुळे आल्लापल्ली, अहेरी शहरातील शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली असून, शाळा बसमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्‍न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.