स्वच्छता जनजागृतीच्या कार्याचा अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर

    दिनांक :12-Mar-2026
Total Views |
श्रीक्षेत्र माहूर, 
महाराष्ट्रातील Swachchhata Janjagruti  स्वच्छता जनजागृती व विविध उपक्रमांबाबतचा कार्यअहवाल महाराष्ट्र राज्याचे स्वच्छतादूत तथा माहूरगडावरील आनंद दत्तधाम आश्रमाचे मठाधीश राष्ट्रसंत सद्गुरू साईनाथ महाराज वसमतकर यांनी मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन सादर केला. या भेटीदरम्यान राज्यभर सुरू असलेल्या स्वच्छता जनजागृती अभियानाची सविस्तर माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांना देण्यात आली. विशेषतः आयटीआय प्रशिक्षण संस्थांमधून होत असलेले स्वच्छताविषयक समाजात स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यासाठी राबवण्यात येणारे विविध उपक‘म तसेच गिरनार पर्वतावर आयोजित सप्ताह स्वच्छता अभियानाबाबतही माहिती देण्यात आली.
 
 
devendra
 
यावेळी स्वच्छतेचे प्रतीक म्हणून झाडू तसेच दत्तप्रभूंची प्रतिमा मुख्यमंत्री फडणवीस यांना भेट देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. राज्यात राबविण्यात येत असलेल्या स्वच्छता मोहिमेबाबत समाधान व्यक्त करत मुख्यमंत्री फडणवीस यांनी या उपक‘मांचे केले. तंबाखू मुक्ती अभियान, Swachchhata Janjagruti  स्वच्छता जनजागृती, महिला सक्षमीकरण, वृक्ष लागवड, व्यसनमुक्ती संदर्भातील ‘व्यसन दहन’ कार्यक्रम, शालेय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन तसेच पेन-पुस्तकांचे वाटप यांसारखे विविध सामाजिक उपक्रम राबविल्याबद्दल त्यांनी विशेष प्रशंसा व्यक्त केली.
 
 
या प्रसंगी राज्याच्या स्वच्छता व ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर उपस्थित होत्या. तसेच राष्ट्रसंत साईनाथ महाराज वसमतकर यांचे शिष्य देवडे यांच्यासह अन्य मान्यवरही उपस्थित होते. राज्यात स्वच्छतेबाबत व्यापक जनजागृती घडवून आणण्यासाठी अशा उपक‘मांना शासनाचे सहकार्य राहील, असा विश्वासही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.