राजौरीत दहशतवाद्यांचा तळ उध्वस्त!

स्फोटकासह अन्न-कपडे जप्त

    दिनांक :12-Mar-2026
Total Views |
जम्मू,
Terrorist base destroyed in Rajouri जम्मू-काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यात सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांचा एक लपवलेला तळ उध्वस्त करत मोठी कारवाई केली आहे. दुर्गम जंगल परिसरात चालवलेल्या शोध मोहिमेदरम्यान हा तळ उघडकीस आला. या कारवाईत स्फोट घडवण्यासाठी तयार ठेवलेले स्फोटक साधन जप्त करण्यात आले असून तळामध्ये अन्नसाहित्य आणि कपड्यांचाही साठा आढळून आला आहे.
 
 
 
Terrorist base in Rajouri
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, थानामंडी परिसरातील चामरेर जंगलात राष्ट्रीय रायफल्सच्या जवानांकडून शोध मोहीम राबवण्यात येत होती. या मोहिमेदरम्यान संशयास्पद ठिकाणी दहशतवाद्यांनी तात्पुरता तळ उभारल्याचे लक्षात आले. त्यानंतर जवानांनी तळाची झडती घेतली असता स्फोटासाठी तयार ठेवलेले स्फोटक साधन, अन्नसाहित्य आणि काही कपडे सापडले. सुरक्षा दलांनी तळ तत्काळ नष्ट केला असून परिसरात पुढील शोध मोहीम सुरू आहे. मात्र या कारवाईदरम्यान कोणालाही अटक करण्यात आलेली नसल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.