हिवरखेड परिसरात वाघाचा आतंक

    दिनांक :12-Mar-2026
Total Views |
६ जनावरांचा पाडला फडशा
 
धारणी, 
Tiger in Hiwarkhed हिवरखेड नजीकच्या सौंदळा येथील शेतकरी बाळकृष्ण मनोहर जवंजाळ यांच्या वारखेड शेत शिवारातील शेतात ११ मार्च रोजी मध्यरात्री ते १२ मार्चच्या पहाटेपर्यंत पट्टेदार वाघाने आतंक माजवून पाच पाळीव प्राणी व एक जंगली प्राणी अशा एकूण ६ जनावरांचा फडशा पाडल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
 
 
Tiger
 
Tiger in Hiwarkhed सदर घटनेचे प्रत्यक्षदर्शी शेतात काम करणारे दादाराव कांबळे हे होते. हा सर्व भयावह थरार त्यांनी अनुभवला आहे. स्वतःचा जीव वाचविण्यासाठी त्यांनी शेतातील खोलीत आधार घेतला म्हणून त्यांचा जीव वाचला. वाघाचा आतंक इतका होता की आपले प्राण वाचविण्यासाठी दोन गाई, एक मोठा गोरा, दोन पाळीव कुत्रे, आणि जंगली डुक्कर या सर्वांनी एकत्रित येत वाघाशी लढताना कडवी झुंज दिली. पण, त्यांच्या संघर्षाला यश आले नाही. क्रूर वाघाने सर्व सहाच्या सहा जनावरांचा फडशा पाडला. यापैकी दोन पाळीव कुत्र्यांचे तर अवशेष सुद्धा उरले नाहीत आणि एका मोठ्या गोर्‍याचा एक पाय आणि शरीराचा अर्धा अवशेष फस्त केलेला आहे. परिसरातील हजार दोन हजार फूट क्षेत्रात मृत जनावरांच्या अवशेष विखुरलेले आहेत. अशी माहिती शेतकर्‍यांनी आणि सौंदळ्याचे पोलिस पाटील राजेंद्र चणेकर यांनी दिली. सदर घटनेची माहिती वन विभागाला देण्यात आली असून पंचनामा करण्यासाठी वनविभागाचे पथक पोहोचले.