विद्या भारतीची विदर्भ जिल्हा बैठक

    दिनांक :12-Mar-2026
Total Views |
आष्टी,
vidya bharatis येथील लोकमान्य विद्यालयात विद्या भारतीच्या विदर्भ जिल्हा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी मदन परसोडकर होते. यावेळी विद्या भारतीचे विदर्भ उपाध्यक्ष बळीराम चव्हाण यांनी जिल्हा व तालुका संघटन या विषयावर मार्गदर्शन केले. संस्कृती ज्ञान परीक्षेच्या माध्यमातून प्रत्येक तालुयांपर्यंत पोहोचता येते. विद्या भारतीचे सहमंत्री रणदीप बिसने यांनी पंचकोश विकास व पंचपदी शिक्षण पद्धती या विषयावर मार्गदर्शन केले.
 

विद्या भारती  
 
 
मदन परसोडकर यांनी कुटुंबप्रबोधन व पर्यावरण आणि विद्या भारतीचे कार्य प्रत्येक तालुयापर्यंत पोहोचविण्याचे आवाहन केले. विद्याभारतीच्या कार्यकर्त्यांनी जर मनावर घेतले तर अशय काहीच नाही, असेही विचार मांडले. हर्षल बुलदेव यांनी संस्कृती ज्ञान परीक्षा, सामूहिक सूर्यनमस्कार, वसंत पंचमी निधी आदी विषयी माहिती दिली. प्रास्ताविक जिल्हा मंत्री गजानन सयाम यांनी केले. संचालन हर्षल बुलदेव यांनी केले.vidya bharatis आभार प्रदर्शन जिल्हा सहमंत्री जयदेव देशपांडे यांनी केले. लक्ष्मीकांत पांडे, हरीश भट्टड, चंद्रशेखर खडतकर, जिल्हा व तालुका पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.