नागपूर,
Abhyankarnagar महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांवर काम न केल्याची टीका आपण नेहमी ऐकतो. मात्र अभ्यंकरनगर परिसरात सध्या याच्या अगदी उलट अनुभव रहिवाशांना येत आहे. धरमपेठ झोनमध्ये कार्यरत असलेले सफाई कर्मचारी मनोज राज बेनुक (राहणार शिवशक्ती नगर, दत्तवाडी) यांच्या कर्तव्यदक्षतेमुळे परिसरातील नागरिक त्यांचे कौतुक करताना दिसतात.
पूर्वीच्या काळी सकाळी दुधाच्या गाडीच्या आवाजाने लोकांना जाग यायची. अभ्यंकर नगरमध्ये मात्र आता दररोज सकाळी सहा वाजता रस्ते स्वच्छ करताना येणाऱ्या झाडूच्या आवाजाने दिवसाची सुरुवात होते. Abhyankarnagar गेली तब्बल २२ वर्षे महानगरपालिकेत सेवा बजावणारे मनोज राज बेनुक रोज सकाळी वेळेवर हजर होऊन दुपारी दोन वाजेपर्यंत प्रामाणिकपणे आपले काम पार पाडतात. त्यांच्या या सातत्यपूर्ण आणि निष्ठेने केलेल्या कामामुळे परिसर स्वच्छ राहत असून नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. अशा कर्तव्यदक्ष सफाई कर्मचाऱ्यांची महानगरपालिकेने दखल घेऊन त्यांचा सन्मान करावा, अशी अपेक्षा स्थानिक रहिवासीनी व्यक्त केली आहे.
सौजन्य: अभय चोरघडे,संपर्क मित्र