नदीत उडी मारणाऱ्या शेतकऱ्याचा मृतदेह सापडला

    दिनांक :13-Mar-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
आर्णी, 
farmers-suicide-case : गुरुवार, 12 मार्च रोजी दुपारी डेहणी येथील 33 वर्षीय कर्जबाजारी शेतकèयाने आर्णी येथील अरुणावती नदीत उडी मारली. दिवसभर शोध घेतल्यानंतरही त्याचा मृतदेह सापडला नाही. अखेर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथकाने शुक्रवारी सकाळी नदीत शोध घेतला आणि दुपारी 12.30 वाजता शेतकरी देविलाल नारायण जाधव याचा मृतदेह सापडला. मृत शेतकèयाच्या वडिलांनी कर्जामुळे नदीत उडी मारून आत्महत्या केल्याची तक्रार केल्यानंतर आर्णी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. आर्णीचे उपतहसीलदार, विभागीय अधिकारी आणि ग्राम महसूल अधिकारी घटनास्थळी पोहोचले, पंचनामा करून अहवाल सादर केला.
 
 
kl
 
दिग्रस तहसीलमधील डेहणीचे रहिवासी नारायण जाधव यांचा मधला मुलगा देवीलाल, याच्याकडे 3.75 एकर शेतजमीन होती. तो कर्जामुळे त्रस्त होता आणि सर्व व्यवहार तो पहात होता. तो आठ दिवसांपूर्वी त्यांच्या सासुरवाडी शारी येथे पत्नीसह गेला होता. त्याने दुपारी नदीत उडी घेतल्यानंतर तहसीलदार वैशाख वाहुरवाघ यांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथकाला कळवले.
 
 
पथकाची पाच सदस्यांचे पथक एका तासात पोहोचली. त्यांनी अंधार पडेपर्यंत नदीत शोध घेतला, पण तो सापडला नाही. शुक्रवारी सकाळी पथकाने शोधमोहीम सुरू केली. दुपारी 12:30 वाजता देवीलालचा मृतदेह नदीपात्रात अडकलेला आढळला.जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाचे किशोर भगत, अमोल भवरे, लखन कैथवास, नीतेश पन्नासे आणि नितीन बुरे यांनी केले. नदीपात्रात अडकलेला देवीलालचा मृतदेह बाहेर काढण्यासाठी त्यांनी कठोर परिश्रम केले. उपतहसीलदार उदय तुंडलवार, मंडळ अधिकारी राजेश नागलकर, ग्राममहसूल अधिकारी आशिष पंचोरे यांनी पंचनामा केला.
 
 
70 हजार रुपयांचे सोसायटीचे आणि इतर अनेक वैयक्तिक कर्जांमुळे देवीलाल अडचणीत होता. या वर्षी खरीपाचे पीक जवळजवळ शून्य असल्यामुळे तो अत्यंत निराश झाला होता. संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी त्याच्यावर होती. देविलालच्या मागे वडील नारायण, पत्नी नीता, कपिल (9) व चंदन (7) ही मुले आणि मोठा परिवार आहे. या घटनेने डेहणी गावात शोककळा आहे.