हिंगणघाट,
cancer-free-campaign-hinganghat : कॅन्सर हा कुणालाही त्रास देत नाही तर कॅन्सरकडे दुर्लक्ष केल्यामुळे त्रास होतो. कॅन्सरच्या चार टप्प्यांपैकी तीन टप्प्यावर उपचार केला जाऊ शकतो, परंतु, दुर्दैव असे की भारतात तिसर्या व चौथ्या टप्प्यात कॅन्सरचे निदान होतात. कॅन्सर हा दबया पावलाने येणारा धोका आहे. त्यामुळे नियमित तपासणी आणि जागृकता आवश्यक आहे. कॅन्सर मुत हिंगणघाट करण्यासाठी भयमुत, अज्ञान मुत आणि अविश्वास मुत हिंगणघाट करावे लागेल, असे मार्गदर्शन नाशिक येथील प्रसिद्ध कॅन्सर रोग तज्ज्ञ डॉ. मुकूल घरोटे यांनी केले.
ते कर्करोग तपासणीच्या गरजेबद्दल जागरूकता पसरवण्यासाठी जागतिक महिला दिनानिमित्त अभिनव विचार मंच व महिला पतंजली योग समिती यांनी संयुतरित्या आयोजित ‘एक पाऊल कॅन्सर मुक्त हिंगणघाट’ या महाशिबिरात बोलत होते. यावेळी नगराध्यक्षा डॉ. नयना तुळसकर, सामाजिक कार्यकर्त्या श्रद्धा कुणावार, डॉ. मनीष माथनकर, डॉ. सीमा मानधनिया, डॉ. अमृता घरोटे, अभिनव विचार मंचचे नितीन सुकळकर, महिला पतंजली योग समिती च्या प्राची पाचखेडे आदी उपस्थित होते.
नगराध्यक्ष डॉ. नयना तुळसकर यांनी आज कॅन्सर सारखा आजार मोठ्या प्रमाणात महिलांमध्ये आढळतात त्यामुळे महिलांनी अशा महाशिबिराची दखल घेत तपासणी करून घेणे आवश्यक आहे. महिलांमध्ये विशेषत: ग्रामीण भागातील महिलांमध्ये कर्करोगाविषयी जनजागृती नाही. परिणामी त्या उपचारासाठी आल्यानंतर बर्याचवेळा उशीर झालेला असतो. कर्करोगाच्या जनजागृतीची आवश्यकता कायम सांगण्यात आली आहे कारण स्त्री सुरक्षित तर घर सुरक्षित, असे त्या म्हणाल्या.
याप्रसंगी डॉ. मनीष माथनकर म्हणाले कॅन्सर हा व्यसनामुळेच होतो असे नाही तर तो कोणालाही होतो. नियमित व्यायाम, योगा केल्यामुळे सुद्धा कॅन्सरवर पुष्कळ प्रमाणात मात करता येते सर्वांनी वर्षातून एकदा तरी स्क्रीन टेस्ट करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. सीमा मानधनिया यांनी आपले शरीर हे आपल्याला शेवटपर्यंत साथ देते. शरीराला स्वस्थ ठेवणे आवश्यक आहे. कोरोना नंतर मोबाईलला आपण बळी पडलो आहोत. त्यामुळे प्रत्येकाने मोबाईलचा उपवास करावा, सोशल मीडियाचा अतिवापर करणे टाळावा असे मार्गदर्शन त्यांनी केले. श्रद्धा कुणावार म्हणाल्या की, आज सर्व काही आपल्याजवळ आहे. पण, आरोग्य आपल्या हातात नाही. त्यामुळे आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. त्यासाठी योगा, प्राणायाम आवश्यक आहे. स्त्री ही सक्षम झाली आहे. स्त्रीला शतीचे रूप मानले जाते. स्त्रीने गर्भावस्था असल्यापासून संस्कार दिले पाहिजे असे त्या म्हणाल्या. प्रास्ताविक नगर सेवक प्राची पाचखेडे यांनी केले तर संचालन वर्षा आजनसरे व आभार सुवर्णा रेवतकर यांनी केले.