अनिल कांबळे
नागपूर,
contaminated water supply दुषित पिण्याच्या पाण्यामुळे नागरिकांचे आराेग्य धाेक्यात असून शहरातील नऊ झाेनमधील 50 वस्त्यांमध्ये दूषित पाणीपुरवठा हाेत असल्यामुळे सुमारे चार लाख नागपूरकरांचे आराेग्य धाेक्यात आले आहे. याप्रकरणी गंभीर दखल घेत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने स्वत:हून जनहित याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने याप्रकरणी महापालिकेला नाेटीस बजावत तीन आठवड्यांत स्पष्टीकरण देण्याचे निर्देश दिले.
महापालिका आणि ओसीडब्ल्यू यांच्यात अलीकडेच झालेल्या एका बैठकीतून ही धक्कादायक माहिती समाेर आली. न्या. अनिल किलाेर आणि न्या. राज वाकाेडे यांच्या खंडपीठासमक्ष याचिकेवर सुनावणी झाली. महापाैर नीता ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत दूषित पाण्याबाबत येणाऱ्या तक्रारींवर चर्चा करण्यात आली हाेती. यानंतर दहापैकी नऊ झाेनमध्ये दूषित पाणीपुरवठा हाेत असल्याचे निदर्शनास आले.
लक्ष्मीनगर झाेन अंतर्गत अजनी, ईस्ट समर्थनगर तर धरमपेठ झाेनअंतर्गत दाभा, पांढराबाेडी, पंचशीलनगर या भागात दूषित पाणीपुरवठा हाेत आहे. धंताेली झाेनअंतर्गत वसंतनगर तर नेहरूनगर झाेनअंतर्गत नंदनवन लेआऊट, गुरुदेवनगर, कवेलू क्वार्टर, ताजबाग हे भाग प्रभावित आहेत. गांधीबाग झाेनमध्ये सिरसपेठ, जलालपुरा, गणेशपेठ, लाेधीपुरा या भागात तर सतरंजीपुरा झाेनमध्ये इतवारी रेल्वे स्टेशन, प्रेमनगर, भानखेडा यासह सुमारे डझनभर वस्त्यांचा समावेश आहे.
आवश्यक उपाययाेजना करावी
लकडगंज झाेनअंतर्गत भांडेवाडी झाेपडपट्टी, पारडी, एचबी टाऊन तर आशीनगर झाेनमध्ये पवननगर, हुडकाे काॅलनी, नारा गाव यांचा समावेश आहे. मंगळवारी झाेन अंतर्गत बाेरगाव, निखारे लेआऊट भागात दूषित पाणीपुरवठा हाेत आहे. शहरात हाेणाèया दूषित पाणीपुरवठ्यामुळे नागरिक आजारी पडत आहेत.contaminated water supply याबाबत न्यायालयाने दखल घेतली असून आवश्यक उपाययाेजनांबाबत पुढील सुनावणीत आदेश दिले जाणार आहेत. न्यायालयीन मित्र म्हणून अॅड. महादुले यांनी बाजू मांडली.